Video : ऋषभ रोहितमध्ये वाद, पांड्या भावांमध्ये वाजलं! आयपीएल स्पर्धेपूर्वी खेळाडूंमध्ये सुरु झाला पंगा
आयपीएल स्पर्धा सुरु झाली की कोण कोणाचं नसतं. कालचे मित्रही आपआपल्या आवडत्या टीमला पाठिंबा देताना एकमेकांचे वैरी होतात. असंच काही टीम इंडियाचे खेळाडू, फॅन्स आणि फ्रेंचायसी मालकांमध्ये झालं आहे. चला काय काय राडा सुरु आहे ते पाहुयात..
मुंबई : आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 22 मार्चला पहिला सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. काल परवापर्यंत एकमेकांसोबत टीम इंडिया एकत्र खेळलेले खेळाडू आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मागच्या पर्वामध्ये एकमेकांना ठसन देण्यातही हे खेळाडू मागेपुढे पाहात नाही. अशी सर्व स्थिती असताना एका खास जाहिरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. खेळाडू एकमेकांना चॅलेंज आणि डिवचण्याची संधी सोडत नाही. इतकंच काय तर एकाच घरात दोन टीम असल्याने भाऊबंधकी सुरु झाली आहे. अभिनेता सुनील शेट्टीनेही जावयाची साथ सोडत मुंबई इंडियन्सचा हात पकडला आहे. तर जवळचे मित्र असलेले रोहित शर्मा आणि ऋषभ पंत एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत.
रोहित शर्माने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ऋषभ पंतसोबत वाद झाल्याचं दिसत आहे. लीग सुरु होताच भाऊबंधकी संपते, असं पंत सांगताना दिसत आहे. हा व्हीडिओ पोस्ट करताना रोहित शर्माने लिहिलं आहे की, “तू नियम तयार करत जा ऋषू..टेबलवर राज्य तर आमचंच असेल. सुनील शेट्टी आमि मी आमची टीम निवडली आहे आता तुझी पाळी.”
View this post on Instagram
इतकंच काय तर केकेआरचा कर्णधार सुनील शेट्टीची भेट घेतो. तेव्हा सुनील शेट्टी त्याला सरळ सांगतो की, मी तर मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. जावई केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असूनही मुंबईला साथ देत आहे. त्याचबरोबर पांड्या ब्रदर्सही एकमेकांना डोळे मोठे करून दाखवत आहेत. माजी खेळाडूही आपआपल्या टीमसाठी भांडणं करत आहेत. मोहिंदर अमरनाथ आणि के श्रीकांत आपल्या टीमची बाजू घेताना दिसत आहेत.
अभिनेत्री प्रीति झिंटा आणि समांथा एकमेकांना टोमणे मारत असल्याचं दिसत आहे. समांथा चेन्नईला पाठिंबा देत आहे. तर प्रीति झिंटा आपल्या मालकीच्या पंजाब किंग्ससोबत असल्याचं सांगत समांथाला डिवचत आहे.