IPL 2021 : आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकर उपलब्ध, बेस प्राईस किती?

माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) त्याचा टी-20 डेब्यू केला आहे.

IPL 2021 : आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकर उपलब्ध, बेस प्राईस किती?
अर्जुन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 8:15 PM

मुंबई : माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळणार आहे. (Arjun Tendulkar Registers For IPL 2021 Auction, Sets Base Price at Rs 20 Lakhs)

अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल (IPL 2021) लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस 20 लाख रुपये इतकी असणार आहे. 18 फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव (IPL Auction 2021) होणार आहे. यात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाईल.

18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यातच आता अर्जुन तेंडुलकर या लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याने अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल.

कधी सुरु होणार आयपीएल 2021?

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी ( IPL 2021) खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. दरम्यान या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारतातच होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यातच आता या मोसमाची तारीखही जवळपास निश्चित झाल्याचं समजत आहे. 11 एप्रिलपासून या 14 व्या मोसमाला सुरुवात होणार असल्याचे वृत्त मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत आयपीएल प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विजय हजारे ट्रॉफी आणि वुमन्स वनडे सीरिजनंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमाला सुरुवात होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या मोसमातील अंतिम सामना 5 किंवा 6 जूनला खेळवण्यात येऊ शकतो. यानुसार बीसीसीआयची टी-20 स्पर्धा साधारण 56 दिवस चालू शकते.

1 एप्रिलच का?

आगामी मोसमाच्या सुरुवातीनंतर अंतिम सामन्याचे आयोजन कुठे आणि कधी करायचे याबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. तसेच इंग्लंड भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी ते 28 मार्च असा हा लांबलचक दौरा असणार आहे. खेळाडू सातत्याने खेळत आहेत. त्यांना काही दिवस विश्रांती मिळावी, या उद्देशाने 14 व्या मोसमासाठी 11 एप्रिल ही तारीख निवडली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टीओआयशी संवाद साधताना दिली.

डेब्यू सामन्यात अर्जुनला चमकदार कामगिरी करता आली नाही

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरियाणा सामन्यात अर्जुनने डेब्यू केला होता. या सामन्यात हरियाणाने मुंबईवर 8 विकेट्सने शानदार विजय (Mumbai vs Haryana) मिळवला. अर्जुनकडून या सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्यानेही निराशा केली. प्रथम बॅटिंग करताना अर्जुन डायमंड डक ( diamond duck) झाला. म्हणजेच एकही चेंडू न खेळता तो रनआऊट झाला. गोलंदाजी करताना त्याने 1 विकेट घेतली. पण त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 पेक्षा अधिकच्या इकोनॉमी रेटने 34 धावा लुटवल्या. तसेच एक कॅचही त्याने सोडला.

जुळून आला योगायोग

टी-20 क्रिकेटमध्ये अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केलं. यासह एक भन्नाट योगायोग जुळून आला आहे. अर्जुन तेंडुलकरचा पिता आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने डोमेस्टेक क्रिकेटमधील अखेरचा सामना हा हरयाणाविरोधात खेळला होता. तर आता 8 वर्षानंतर अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केले आहे. यामुळे पिता पुत्रांचा 8 वर्षानंतर हरयाणाविरोधातील योगायोग जुळून आला आहे.

मुंबई नजीकच्या परिसरात साखळी सामने

टीओआयनुसार, आयपीएलच्या 14 व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत. तसेच अहमदाबादमधील मोटेरा आणि सरदार पटेल स्टेडियममध्ये बाद फेरीतील (Knock Out) सामन्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा

Mumbai vs Haryana | अर्जुन तेंडुलकर शून्यावर बाद, गोलंदाजीही चोपली, 3 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस

अर्जून तेंडुलकर मुंबईच्या संघात, पण निवडीवर का वाद?

Vijay Hazare Trophy साठी मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरसह एकूण 103 खेळाडूंची निवड

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.