Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर रनअप मोजताना दिसला, संधी नाहीच, सचिनच्या लेकाचा डेब्यू कधी?

सामना सुरू होण्यापूर्वी अर्जुन तेंडलुकर रनअप मोजत असल्याचं टीव्हीवर दाखवण्यात आलं. तेव्हा अर्जुन हा सामना खेळतोय असं सर्वांना वाटलं.

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर रनअप मोजताना दिसला, संधी नाहीच, सचिनच्या लेकाचा डेब्यू कधी?
अर्जुन तेंडुलकर रनअप मोजताना दिसलाImage Credit source: aaj tak
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 8:01 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. या एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) वर विजय मिळवला. मुंबईने दिल्लीवर पाच विकेट राखून विजय मिळवला. मात्र, यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डेब्यू करणार असं वाटलं पण आता त्याला पुन्हा पदार्पणासाठी वर्षभर वाट पहावी लागणार आहे. अर्जुनच्या डेब्यूबद्दल बोलू या. आधी पाहूया कालच्या सामन्याविषयी. कालच्या सामन्यात रमणदीप सिंहने चौकार ठोकून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सच्या कालच्या विजयाचा नायक पुन्हा एकदा टिम डेविड आहे. टिम डेविडने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला हा विजय मिळवता आला. टिम डेविडने 11 चेंडूत 34 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होते. मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झालाय. दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. दिल्लीने विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने 19.1 षटकात हे लक्ष्य पार केलं. सामना रोमांचक स्थिती मध्ये असताना टिम डेविड आला. त्याने फटकेबाजी केली व सर्व गणितचं बदलून टाकलं. कालत्या सामन्यात सचिनच्या लेकाचा डेब्यू मात्र राहिलाच.

सचिनच्या लेकाचा डेब्यू कधी?

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. आयपीएल 2021 नंतर आयपीएल 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळायला मिळालेला नाही. अर्जुन तेंडुलकर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नक्कीच खेळेल, असं बोललं जात होतं. कारण, रोहित शर्माने मागच्या सामन्यात नवीन खेळाडूंना आजमावणार असल्याचं बोललं होतं. पण हे होऊ शकलं नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण निश्चित असल्याचं दिसत होतं. पण तसं झालंही नाही. कारण सामना सुरू होण्यापूर्वी अर्जुन तेंडलुकर रनअप मोजत असल्याचं टीव्हीवर दाखवण्यात आलं. तेव्हा अर्जुन हा सामना खेळतोय असं सर्वांना वाटलं. कारण, अनेकदा गोलंदाज सामन्यापूर्वी आपल्या धावांचे मोजमाप करतात. जेणेकरून सामन्यादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये. पण अर्जुन स्वत:साठी नव्हे तर सहकारी खेळाडूला मदत करत होता.

हे सुद्धा वाचा

संधी नाहीच

मेगा ऑक्शनमध्ये 22 वर्षीय अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना घेतले होते. गेल्या हंगामातही अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससोबत होता. त्यानंतर मुंबईने अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपयांना घेतले आहे. आता अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी पुन्हा वर्षभर वाट पहावी लागणार आहे.

रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.