‘भारतीय संघात निवड होताच आईवडिलांना कडकडून मिठी मारली’, 23 वर्षीय अर्जन नागवासवाला भावूक
भारतीय संघात निवड झाल्यानंतर अर्जन नागवासवाला काहीसा भावूक झाला होता. निवड झाली त्यावेळी मी घरी नव्हता. जसाही घरी पोहोचलो तशी आईबाबांना कडकडून मिठी मारली, असं अर्जनने सांगितलं. (Arzan Nagwaswalla reaction After Select In India team WTC Final 2021 India vs England)
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 ( World Test Championship final) च्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंडविरुगृद्धच्या कसोटी मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने निवडलेल्या संघात राखीव खेळाडू म्हणून 23 वर्षीय गोलंदाज अर्जन नागवासवाला (Arzan Nagwaswalla) याचीही निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात निवड झाल्यानंतर अर्जन नागवासवाला काहीसा भावूक झाला होता. निवड झाली त्यावेळी मी घरी नव्हता. जसाही घरी पोहोचलो तशी आईबाबांना कडकडून मिठी मारली, असं अर्जनने सांगितलं. (Arzan Nagwaswalla reaction After Select In India team WTC Final 2021 India vs England)
23 वर्षीय अर्जनने इतिहास घडवला
मूळचा गुजराती असलेला अर्जनचं वय वर्ष केवळ 23 आहे. इतक्या कमी वयात त्याने खास इतिहास रचला आहे. 46 वर्षानंतर प्रथमच भारतीय संघात निवड झालेला तो पहिला पारशी खेळाडू आहे. अर्जन अगोदर फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) भारतीय संघात खेळले होते. त्यानंतरच्या 46 वर्षांत कोणत्याही पारशी खेळाडूला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकली नाही किंबहुना पारशी खेळाडू भारतीय संघाचं दार ठोठावू शकले नाहीत. मात्र अर्जनने इतिहास घडवला.
सगळ्यात प्रथम आई वडिलांना फोन केला
टीम इंडियात निवड झाल्याचा आनंद अर्जनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शनिवारी त्याने आयएएनएसशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “ज्यावेळी माझ्या निवडीची घोषणा झाली त्यावेळी सगळ्यात आधी मी माझ्या आई वडिलांना फोन केला. त्यांना माझ्या निवडीची बातमी दिली. त्यांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. माझा हा प्रवास रोमांचित करणारा होता. ज्यावेळी मला ही बातमी समजली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी आल्याआल्या मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आई-बाबांना कडकडून मिठी मारली ”
मला माझ्यावर विश्वास होता
“मी पूर्णपणे थकून गेलो होतो. एवढा थकलो होतो की मुश्किलीने मी आलेले फोन घ्यायचो. मला वाटत नव्हतं की माझी भारतीय संघात निवड होईल पण मला इतकं मात्र माहित होतं की एक ना एक दिवस माझी भारतीय संघात नक्की निवड होईल. मला माझ्यावर विश्वास होता”, असं अर्जनने सांगितलं.
क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व
अर्जन फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करतो. अर्जनने आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या लिलावसाठी अर्ज केला होता. अर्जनची बेस प्राईज 20 लाख होती. मात्र त्यानंतरही अर्जन दुर्देवाने अनसोल्ड राहिला. अर्जनने आयपीएलच्या आधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विजय हजारे स्पर्धेतील 7 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या. त्याने शानदार गोलंदाजीच्या जोरावर सेमी फायनलपर्यंत आपल्या संघाला पोहचवलं होतं.
(Arzan Nagwaswalla reaction After Select In India team WTC Final 2021 India vs England)
हे ही वाचा :
PHOTO | धमाकेदार कामगिरीनंतरही IPL 2021 मध्ये अनसोल्ड, आता थेट इंग्लंड दौऱ्यासाठी निवड