Ashesh : याला येडं म्हणावं की खुळं, भर सामन्यात लाबूशेनने मातीसोबत खाललं… व्हिडीओ जोरदार व्हायरल!
पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकत धमाकेदार सुरुवात केली आहे. आता दुसरा सामना रंगतदार स्थितीत आहे, मात्र या सामन्यामध्ये स्टार खेळाडू लाबूसेन याने भर मैदानात केलेल्या एका कृत्यामुळे तो चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मुंबई : ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू मार्नस लाबूशेन क्रिकेट व्यतिरिक्तही कायम इतर गोष्टींमुळे चर्चेत असतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेमधील दुसरा सामना सध्या पार पडत आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकत धमाकेदार सुरुवात केली आहे. आता दुसरा सामना रंगतदार स्थितीत आहे, मात्र या सामन्यामध्ये स्टार खेळाडू लाबूसेन याने भर मैदानात केलेल्या एका कृत्यामुळे तो चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
पाहा व्हिडीओ-
Watch Marnus Labuschagne picking the chewing gum and eating it back after it slipped on the ground from his mouth, in the latest Ashes development.#TheAshes #ENGvsAUSpic.twitter.com/PzH1rpEaWN
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) June 29, 2023
मार्नस लबुशेन क्रीझवर फलंदाजीसाठी उपस्थित होता. त्याची सवय अशी आहे की तो फलंदाजी करताना तोंडात च्युइंगम चघळत राहतो. त्यामुळे तो ट्रोल झाला. त्याच्या फलंदाजीदरम्यान ड्रिंक्स ब्रेक होता. यानंतर जेव्हा तो पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज होऊ लागला तेव्हा त्याच्या तोंडातून च्युइंगम जमिनीवर पडला. आढेवेढे न घेता त्याने जमिनीतून च्युइंगम उचलला आणि पुन्हा तोंडात घातला.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.