Eng vs Aus 3rd Test | तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंड 195 धावांनी पिछाडीवर
England vs Australia, 3rd Test Day 1 Stumps | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
हेडिंग्ले | अॅशेस सीरिज 2023 मधील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंड पहिल्या डावात अजून 195 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली. इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 68 धावा केल्या आहेत. जो रुट 19 आणि जॉनी बेयरस्टो 1 धावांवर नाबाद आहेत. तर सलामीवीर झॅक क्रॉली 33 धावांवर आऊट झाला. बेन डकेट याने 2 धावा केल्या. तर हॅरी ब्रूक 3 धावा करुन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने 2 तर मिचेल मार्श याने 1 विकेट घेतली.
पहिल्या दिवशी एकूण 13 विकेट्स
An eventful day one saw 13 wickets fall in Leeds in the third #Ashes Test.#WTC25 | #ENGvAUS ?: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/Huu5aCgC3G
— ICC (@ICC) July 6, 2023
त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक 118 धावांची शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर याने 4, उस्मान ख्वाजा 13, मार्नस लाबुशेन 21, स्टीव्हन स्मिथ 22, ट्रेव्हिस हेड 39, एलेक्स कॅरी 8, मिचेल स्टार्क 2 आणि टॉड मर्फी याने 12 धावा केल्या. कॅप्टन पट कमिन्स याला भोपळाही फोडता आला नाही. तर स्कॉट बॉलँड झिरोवर नाबाद परतला.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम प्लेईंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.