ENG vs AUS 2nd Test | ऑस्ट्रेलियाचा लॉर्ड्स कसोटी सामन्यात 43 धावांनी विजय, इंग्लंडचा सलग दुसरा पराभव
Ashes Series 2023 ENGLAND vs AUSTRALIA 2nd Test | ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर यजमान इंग्लंड टीमला 43 धावांनी पराभूत मालिकेत 2-0 अशा फरकाने मोठी आघाडी घेतली आहे.
लॉर्ड्स | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंड क्रिकेट टीमवर 43 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान मिळालं होतं. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 257 धावांची आणखी गरज होती. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 155 धावांची शानदार खेळी केली. मात्र बेन स्टोक्स याच्या शतकानंतरही इंग्लंडला जिंका आलं नाही. इंग्लंडला 81.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 327 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ
इंग्लंडने पाचव्या दिवसाची सुरुवात 4 बाद 114 धावसंख्येपासून केली. बेन डकेट आणि कॅप्टन बेन स्टोक्स शानदार पद्धतीने खेळत होते. त्यामुळे इंग्लंडस जिंकेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पहिल्या सत्रातच बेन डकेट आणि जॉनी बेयरस्टो आऊट झाले. त्यामुळे इंग्लंड बॅक फुटवर गेली. बेन डकेट याने 83 धावांची खेळी केली. तर जॉनी बेयरस्टो 10 रन्स करुन आऊट झाला.
6,6,6 आणि शतक पूर्ण
एकाबाजूला विकेट गेले होते. मात्र त्यानंतरही बेन स्टोक्स फटकेबाजी करतच होता. स्टोक्सने सलग 3 सिक्स खेचत शतक पूर्ण केलं. स्टोक्सच्या शतकामुळे इंग्लंडचा विजय आणखी जवळ आला होता. मात्र इतक्यात जोश हेझलवूड याने स्टोक्सला 155 धावांवर आऊट केलं. स्टोक्स आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाने सामन्यात कमबॅक केलं. हेझलवूडने निर्णायक क्षणी ऑस्ट्रेलियाला विकेट मिळवून दिले. हेझलवूडने एकूण 5 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा लॉर्ड्स कसोटीत विजय
A hard-fought win ?
Australia overcome brilliant Ben Stokes to go 2-0 up in the #Ashes ✌#WTC25 | #ENGvAUS ?: https://t.co/liWqlPCKqn pic.twitter.com/Zc2cyOsrBw
— ICC (@ICC) July 2, 2023
सामन्यावर धावती नजर
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 416 ऑलआऊट
इंग्लंड पहिली इनिंग – 325 ऑलआऊट
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव – 279 ऑलआऊट. (91 धावांची आघाडी)
ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान
इंग्लंड दुसरा डाव – 279 ऑलआऊट
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.
तिसरा कसोटी सामना केव्हा?
दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना हा 6 जुलै ते 10 जुलै रोजी हेडिंग्ले लीड्स इथे खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर इंग्लंडसाठी हा करो या मरो असा सामना असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी घोडदौड सुरु ठेवणार की इंग्लंड कमबॅक करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.