Test Cricket | कसोटी सामन्यासाठी टीमकडून प्लेइंग इलेव्हन जाहीर, कुणाला मिळाली संधी?
test cricket | कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. टीमने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पाहा कुणाला मिळाली संधी?
मुंबई | क्रिकेट विश्वात आज अनेक घडामोडी झाल्या. आयसीसीने आगामी वनडे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. सलामी आणि अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. आता वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्व संघांना प्रतिस्पर्ध्यांची माहिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने तयारीला लागणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे भारतातील 10 शहरांमध्ये करण्यात आले आहे.
या स्पर्धेला अजून बरेच दिवस आहेत. याआधी टीम इंडियाला विंडिज दौरा आणि आशिया कप स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका खेळवण्यात येत आहे. या दोन्ही संघातील कसोटी मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 ला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
आता या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टेस्टला बुधवार 28 जूनपासून सुरुवात होत आहे. या सामन्याचं आयोजन क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर करण्यात आलं आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केलं आहे. मोईन अली याला दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे. त्यामुळे मोईनच्या जागी संघात वेगवान गोलंदाज जॉश टंग याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
अशी आहे इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
? We can confirm our team for the second Ashes Test match at Lord's.
Congratulations, Josh Tongue ? #EnglandCricket | #Ashes
— England Cricket (@englandcricket) June 27, 2023
टीम मॅनेजमेंटचा आश्चर्यकारक निर्णय
साधारणपणे लाईक टु लाईक रिप्लेसमेंट घेतली जाते. म्हणजे बॅट्समनच्या जागी बॅट्समनची निवड केली जाते. मात्र फिरकीपटू मोईनच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इंग्लंड टीममध्ये मोईनच्या जागी लेग स्पिनर रेहान अहमद याला संधी देता आली असती. मात्र तसं झालं नाही.
जॉशने आतापर्यंत इंग्लंडसाठी अवघी एक कसोटी खेळली आहे. जॉशने 1 जून रोजी आयर्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. जॉशने पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली. जॉशने दुसऱ्या डावात 66 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात आयर्लंडवर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता जॉश ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी कामगिरी करतो, याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.