What A Catch | Joe Root याने घेतला विराट कोहली याच्यापेक्षा सुपर कॅच, व्हीडिओ व्हायरल

Joe Root One Handed Catch | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात जो रुट याने स्लीपमध्ये अप्रतिम कॅच घेतला.

What A Catch | Joe Root याने घेतला विराट कोहली याच्यापेक्षा सुपर कॅच, व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 11:53 PM

लंडन | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस सीरिजमधील पाचवा आणि अंतिम सामना हा मँचेस्टर लंडन इथे खेळवण्यात येत आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडने ऑलआऊट 283 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात ऑलआऊट 295 रन्स करुन 12 धावांची नाममात्र आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने 47 आणि डेव्हिड वॉर्नरने 24 धावांचं योगदान दिलं. तर शेवटी पॅट कमिन्स याने 36 तर टॉड मर्फीने 34 रन्स केल्या. या दोघांनी शेवटी केलेल्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 250 पार मजल मारता आली. तर ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना खास असं काही करता आलं नाही.

इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉड, जो रुट आणि मार्क वूड या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जेम्स एंडरसनच्या खात्यात 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगदरम्यान इंग्लंडच्या जो रुट याने घेतलेल्या कॅचने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत पहिल्या डावात लंचपर्यंत 2 विकेट्स गमावल्या होत्या. या दरम्यान जो रुटने अविश्वसनीय असा कॅच घेतला. रुटने घेतलेला कॅच पाहून सर्वच अवाक राहिले.

कडक प्लेअर कडक कॅच

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 43 वी ओव्हर मार्क वूड टाकत होता. या ओव्हरमधील पाचवा बॉल मार्नस लाबुशने याने डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटला स्पर्श करुन फर्स्ट स्लिपच्या दिशेने गेला. बॉल आपल्या दिशेने येतोय हे पाहताच रुटने उडी घेत एकाहातीने सुंदर कॅच घेतला. रुटच्या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि टॉड मर्फी.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.