ENG vs AUS 4th Test | चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन जाहीर, टीममध्ये मोठा बदल
Ashes 2023 England vs Australia 4th Test इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
मँचेस्टर | अॅशेस 2023 मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवार 19 जुलैपासून सुरुवात होतेय. या चौथ्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडने 2 दिवसांआधी म्हणजेच 17 जुलैला चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला. बेन स्टोक्सने ओली रॉबिन्सन याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला. तर इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स एंडरसन याची पुन्हा एन्ट्री झाली आहे.
आता चौथ्या सामन्याला काही तास शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केलीय. ऑस्ट्रेलियानेही इंग्लंडप्रमाणे टीममध्ये 1 बदल केलाय. स्कॉट बॉलँड याचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट केलाय. तर त्याच्या जागी जोश हेझलवूड याची एन्ट्री झालीय.
ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडीवर
दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने सलग 2 सामने जिंकत शानदार सुरुवात केली. रंगतदार झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी कायम ठेवली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात कांगारुंनी इंग्लंडवर 43 धावांनी मात केली.
सलग 2 सामने गमावल्याने इंग्लंडसाठी तिसरा सामना हा ‘करो या मरो’ असा होता. त्यामुळे इंग्लंडसाठी सामना प्रतिष्ठेचा होता. इंग्लंडनेही तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धु्व्वा उडवला आणि मालिकेतील आव्हान कायम राखलं. त्यामुळे चौथा सामना हा रंगतदार होणार इतकं निश्चित आहे.
अशी आहे चौथ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
Australia have made two changes to their XI for the Manchester Test ?#ENGvAUS #WTC25
— ICC (@ICC) July 18, 2023
चौथ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कॅप्टन) , बेन डकेट, मोईन अली, झॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जोनाथन बॅरिस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स एंडरसन.