ENG vs AUS Live Streaming | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅशेस सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात
Ashes Series 2023 ENG vs Aus 1st Test Live Streming | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या असलेल्या अॅशेस सीरिजला शुक्रवार 15 जूनपासून सुरुवात होत आहे.
एजबस्टेन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम अॅशेस सीरिजसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची ज्या प्रकारे आपल्याकडे प्रतिक्षेने वाट पाहली जाते, तितक्याच किंवा त्यापेक्षा दुप्पट प्रतिक्षेने या अॅशेस सीरिजची क्रिकेट चाहते वाट पाहत असतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी ही प्रतिष्ठेची अशी मालिका असते. या प्रतिष्ठेच्या मालिकेला शुक्रवार 16 जूनपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही पॅट कमिन्स याच्याकडे आहे. तर इंग्लंडचं कर्णधारपद बेन स्टोक्स सांभाळणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
अॅशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सज्ज
An epic battle awaits as England and Australia reignite the #Ashes rivalry ?
हे सुद्धा वाचाAll you need to know about the upcoming #WTC25 series ?https://t.co/PgvdC4kJim
— ICC (@ICC) June 15, 2023
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना केव्हा?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 16 ते 20 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन कुठे?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन हे एजबेस्टन बर्मिंघम इथे करण्यात आलं आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहता येईल.
डिजीटल स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
तसेच सामना मोबाईलवर पाहण्यासाठी सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
इंग्लंड क्रिकेट टीम
बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, जॅक क्रॉली, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मोइन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन, डॅनियल लॉरेन्स, जोश टोंग, मॅथ्यू पॉट्स , मार्क वुड आणि क्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया टीम
पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श, स्टीवन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, मारनस लाबुशेन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिशेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेज़लवुड, स्कॉट बोलँड, टॉड मर्फी , जोश इंगलिस, मॅट रेनशॉ आणि मार्कस हॅरिस.