Ashes 2023 | पाचव्या कसोटी इंग्लंड संघ जाहीर, कुणाला संधी कोण आऊट?
England Cricket Team Squad For 5th Test Match | ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने इंग्लंडचा अंतिम सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.
लंडन | इंग्लंड क्रिकेटने प्रतिष्ठेच्या अॅशेस सीरिजमधील पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने या 14 जणांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. चौथा कसोटी सामना हा पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे इंग्लंडचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. तर ऑस्ट्रेलियाने सीरिज रिटेन केली. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या पाचव्या सामन्यात बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड टीमचा मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असेल. या पाचव्या सामन्याचं आयोजन हे गुरुवार 27 जुलै ते सोमवार 31 जुलै दरम्यान लंडनमधील केनिंग्टन ओव्हल इथे करण्यात आलंय.
England named an unchanged 14-member squad for the fifth #Ashes Test as they aim to draw level in the series ?#ENGvAUS #WTC25 pic.twitter.com/gfQhDRvH5T
हे सुद्धा वाचा— ICC (@ICC) July 24, 2023
इंग्लंडने टीम कायम राखलीय.मोईन अली याच्यावर विश्वास दाखवलाय. झॅक क्राऊली आणि बेन डकेट या दोघांना कायम ठेवलंय. जॉनी बेयरस्टो आणि हॅरी ब्रूक्स या दोघांना आपलं स्थान कायम राखण्यात यश आलंय. तसेच जेम्स एंडरसन, ओली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स आणि मार्ड वूड या चौघांवर कॅप्टन बेन स्टोक्स याने विश्वास दाखवलाय.
पावसामुळे चौथा सामना ड्रॉ
दरम्यान चौथ्या कसोटी साम्यात इंग्लंड मजबूत स्थितीत होती. मात्र पाचव्या दिवशी झालेल्या पावसामुळे इंग्लंडचा गेम झाला.पाचव्या दिवशी पाऊस झाला नसता तर इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र आता इंग्लंड क्रिकेट टीम पाचव्या सामन्यात विजयाच्या तयारीने मैदानात उतरण्याचा मानस प्रयत्नात असेल.
मालिकेचा निकाल झटपट
ऑस्ट्रेलियाने पहिला सामना हा 2 विकेट्सने जिंकला. ऑस्ट्रेलियाने यासह 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने धडाका कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसरा विजय मिळवला. आता तिसरा सामना इंग्लंडसाठी करो या मरो असा होता. इंग्लंडने या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने चितपट केलं. इंग्लंडने यासह मालिकेतील विजयाचं खातं उघडलं. चौथ्या सामन्यातही इंग्लंडला विजयाची संधी होती. मात्र पावसाने ती संधी हिरावून घेतली.
पाचव्या कसोटी सामन्यासाठी 14 सदस्यीय इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, जेम्स अँडरसन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
अॅशेस सीरिजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड टॉड मर्फी, स्कॉट बोलँड, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर आणि जोश इंग्लिश.