लंडन : लॉर्ड्सच्या लॉन्ग रुममध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमला वाईट वागणूक देण्यात आली. या संबंधी Action घेण्यात आली आहे. MCC म्हणजेच मेरीलबोन क्रिकेट क्लबने ही कारवाई केली. MCC ने या संपूर्ण प्रकरणात 3 सदस्यांना सस्पेंड केलं. Ashes सीरीजमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी लॉर्ड्सवर ही घटना घडली.
MCC ने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत झालेल्या वाईट वर्तणुकीबद्दल माफी मागितली आहे. काल दुसऱ्या कसोटीचा शेवटचा दिवस होता. लॉर्ड्सच्या लॉन्ग रुममध्ये उपस्थित MCC सदस्यांनी ऑस्ट्रेलियन टीमच्या खेळाडूंसोबत वाईट वर्तणूक केली. त्यांना अपशब्द सुनावले. शिवीगाळ केली. विषय हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचला.
MCC ने काय म्हटलं?
MCC ने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. त्यांनी 3 सदस्यांना सस्पेंड केलं आहे. ऑस्ट्रेलियन टीमसोबत जे झालं, ते सहन करण्यापलीकडे आहे. आम्ही याची निंदा करतो, असं MCC ने म्हटलय. सदस्यांच्या वर्तनामुळे क्लबच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलया. आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मनापासून माफी मागतो, असं MCC ने सांगितलं.
Fair to say a few of the members at Lords aren’t happy with the… laws of the game? ?#TheAshes 2nd Test | Live, on Channel 9 & 9Now.#9WWOS #Cricket #Ashes #ENGvsAUS pic.twitter.com/jdkIBHrlLJ
— Wide World of Sports (@wwos) July 2, 2023
कशावरुन झाली सुरुवात?
लॉर्ड्सच्या लॉन्ग रुममध्ये जे झालं, त्यामुळे MCC ला माफी माागावी लागली. आपल्या सदस्यांविरोधात कारवाई करावी लागली. जॉनी बेयरस्टोचा विकेट गेल्यानंतर या सगळ्याची सुरुवात झाली. कॅमरुन ग्रीनचा बाऊन्सर हुकवल्यानंतर बेयरस्टो क्रीजच्या बाहेर आला. दुसऱ्या एन्डला उभ्या असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडच्या दिशेने चालत गेला. विकेटच्या मागे उभ्या असलेल्या एलेक्स कॅरीने चेंडू हातात घेऊन बेल्स उडवल्या.
???#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/dDGCnj4qNm
— England Cricket (@englandcricket) July 2, 2023
इंग्लंडची टीम हैराण
ऑस्ट्रेलियन टीम या विकेटच सेलिब्रेशन करते. त्यावर इंग्लंडची टीम हैराण होते. बेयरस्टोचा विकेट अशा पद्धतीने गेल्यानंतर डिसेंट वागण्याासाठी ओळखले जाणारे लॉर्ड्सचे प्रेक्षक खवळले. त्यांना राग आला. ऑस्ट्रेलिया बेईमान असल्याच्या घोषणा दिल्या. क्रिकेमधील खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.