England vs Australia : बेन स्टोक्स याने पकडला अफलातून झेल, व्हिडीओ Viral
Ben Stokes Catch Video : पाचव्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 283 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंनी 295 धावा करत 12 दिवसांची आघाडी घेतली आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावांची महत्त्वाची खेळी केली. तर बेन स्टोक्सनेही एक नंबर झेल घेतला.
मुंबई : अॅशेसमधील शेवटचा म्हणजेच पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामधील स्टीव्ह स्मिथच्या रन आऊटचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरलाय. क्रिकेट वर्तुळात तिसरे पंच नितीन मेनन यांच्या या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रन आऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेच त्यासोबतच आणथी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अफलातून झेल घेतला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा खेळाडू जो रूट बॉलिंग करत होता. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सिक्स मारण्यासाठी मोठा फटका खेळला. सीमारेषेवर बेन स्टोक्स तैनात होता. पठ्ठ्याने हवेच उडी मारत झेल घेतला मात्र त्याचा तोल गेला. त्यावेळी स्टोक्सने सीमारेषेवर उडी मारत चेंडू आतमध्ये फेकला आणि परत आतमध्ये येवून झेलला.
पाहा व्हिडीओ -:
What a way to finish the day! ?
A stunning grab from the captain brings Day 2 to a close ?
Australia lead by 1️⃣2️⃣ at the end of the first innings…#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/EdsUjrfmk7
— England Cricket (@englandcricket) July 28, 2023
दरम्यान, पाचव्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 283 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंनी 295 धावा करत 12 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावांची महत्त्वाची खेळी केली.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (W), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (C), जोश हेझलवूड, टॉड मर्फी
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (C), जॉनी बेअरस्टो (W), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन