Ashwin Retirement Controversy: मला अश्विनीच्या निवृत्तीबाबत अगदी शेवटच्या मिनिटाला कळाले…वडिलांनी काय केला आरोप
भारताचा नंबर वन गोलंदाज आर.अश्विन याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना हादरा बसला आहे. त्याच्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आम्हाला धक्का बसल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.
भारतीय ऑफ स्पिनर गोलंदाज आर.अश्विन याने गाबा कसोटी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने अचानक असा निर्णय घेतल्याने सर्वाना धक्का बसला आहे. अखेर अश्विन याने मध्येच का असा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याच्या वडिलांनी या प्रकरणात अखेर आपले मौन सोडले आहे. आपल्या मुलाला टीम इंडियात अपमानित केले जात होते त्यामुळेच त्याने अशी निवृत्ती जाहीर केली असे अश्विन याच्या वडिलांनी मीडियाशी बोलताना केला आहे.
अश्विनला अपमान सहन करावा लागत होता ?
माझ्या मुलाला टीम इंडियात वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडून निवृत्ती घेतली आहे. माझ्या मुलाच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने मी देखील अवाक झाल्याचे अश्विन याच्या वडिल रविचंद्रन एका खाजगी चॅनलशी बोलताना म्हटले आहे.
मला देखील माझ्या मुलाच्या निवृत्तीबाबत अखेरच्या क्षणाला कळले. त्याच्या डोक्यात काय सुरु होते. हे मला काही समजले नाही. त्याने फक्त घोषणा करुन टाकली. मी देखील त्याच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे.परंतू ज्या प्रकारे त्याने निवृत्ती घेतली याने मी आनंदी देखील आणि दु:खी देखील आहे. कारण त्याने खेळत रहायला होते. रिटायर होणे हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्यात मी दखल देऊ शकत नाही. परंतू ज्या प्रकारे त्याने निवृत्ती घोषीत केली आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. ती अश्विनला माहिती असतील, यास अपमान देखील कारणीभूत असू शकतो असेही त्याच्या वडीलांनी म्हटले आहे.
अश्विनचे वडिलांना सांगितले की अश्विनचे रिटायर होणे आमच्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. कारण तो १४ ते १५ अवर्षे खेळला आणि अचानक रिटायरमेंटमुळे आम्हाला धक्का बसला आहे.आम्हाला असे वाटतंय की त्याचा वारंवार अपमान होत होता. तो हे केव्हापर्यंत सहन करणार आहे. त्यामुळे अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचेही वडिल रविचंद्रन यांनी म्हटले आहे.
अश्विनवर विश्वास दाखवला नाही ?
अश्विन सध्याच्या काळातला टीम इंडियाचा बेस्ट बॉलर राहीला आहे. भलेही तो जगातला नंबर एकचा टेस्ट बॉलर राहीला असेल तरीही याच्यानंतर टीम इंडियात त्याला तो सन्मान मिळाला नाही ज्याचा तो लायक आहे असे त्याचे वडिल रविचंद्रन यांनी म्हटले आहे. अश्विनची दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपमध्ये कामगिरी शानदार झाली आहे. परंतू गेल्या अंतिम सामन्यात त्याला राखीव खेळाडू म्हणून बसवले होते. यावर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील मत मांडले होते. ते म्हणाले होते की तुम्ही जर जगातल्या नंबर वन फलंदाजाला प्लेईंग इलेव्हनमध्ये ठेवत असाल तर जगातल्या नंबर वन गोलंदाजास का बेंचवर बसवता ? अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही अश्विनला पर्थ टेस्टची संधी दिली नव्हती. एडलेटमध्ये तो खेळला आणि तिसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा त्याला बसवले…