Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये भारत विजयाची हॅट्ट्रिक करणार? हे 2 योगायोग काय सूचित करतात? जाणून घ्या…
2018 आशिया चषक देखील UAE मध्ये खेळला गेला होता जेथे भारताने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत करून सलग दुसरे आणि एकूण 7वे विजेतेपद पटकावले होते. याविषयी अधिक सविस्तर वाचा..
मुंबई : आशिया चषक (Asia Cup 2022)सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. यूएई (UAE) मध्ये आयोजित या स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाईल, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. गतविजेत्या भारताच्या नजरा यंदाच्या आशिया चषकात विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे असतील.2016 आणि 2018 मध्ये भारत आशियाई किंग ठरला आहे, त्यामुळे रोहित शर्माला सलग तिसऱ्यांदा संघ चॅम्पियन बनवायचा आहे. दोन योगायोगांमुळे भारताचा विजेतेपदाचा दावा मजबूत झाला, ज्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. आशिया चषक 2022चे यजमानपद यापूर्वी श्रीलंकेत होते. पण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाची स्थिती पाहता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अखेरच्या क्षणी हात मागे घेतले.
श्रीलंकेच्या या निर्णयानंतर न्यूट्रल वेन्यू यूएईला यजमानपदाची संधी देण्यात आली. 2018 आशिया चषक देखील UAE मध्ये खेळला गेला होता जेथे भारताने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत करून सलग दुसरे आणि एकूण 7वे विजेतेपद पटकावले होते.
समीकरण काय?
2018 च्या आशिया चषकाच्या गटाबद्दल बोलायचे तर, ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसह हाँगकाँग होते, तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश होते. यावेळीही गट समीकरण सारखेच आहे. पात्रता फेरीतील तीनही सामने जिंकून हाँगकाँगने भारत आणि पाकिस्तानच्या गटात आपले स्थान पक्के केले आहे.
हायलाईट्स
- आशिया चषक 2022चे यजमानपद यापूर्वी श्रीलंकेत होते
- आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशाची स्थिती पाहता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अखेरच्या क्षणी हात मागे घेतले.
- श्रीलंकेच्या या निर्णयानंतर न्यूट्रल वेन्यू यूएईला यजमानपदाची संधी देण्यात आली.
- 2018 आशिया चषक देखील UAE मध्ये खेळला गेला होता जेथे भारताने बांगलादेशला अंतिम फेरीत पराभूत करून सलग दुसरे आणि एकूण 7वे विजेतेपद पटकावले होते.
2018 मधील भारताची कामगिरी
ग्रुप स्टेजमध्ये हाँगकाँग आणि पाकिस्तानवर सहज विजय मिळवून भारत सुपर 4 साठी पात्र ठरला. या फेरीत टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानचा 9 विकेट राखून पराभव केला आणि बांगलादेशचा 7 विकेट राखून पराभव केला.तिसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानविरुद्ध बरोबरी साधली.सुपर 4 मध्ये तीन पैकी दोन सामने जिंकून अंतिम फेरी गाठली जिथे टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा 3 गडी राखून विजेतेपद पटकावले.