Asia Cup 2022: T20 वर्ल्डकपपूर्वीच भारत-पाकिस्तान आमनेसामने, आशिया चषक स्पर्धेच्या तारखा जाहीर
भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) पुरुष क्रिकेट संघ या वर्षी एकापेक्षा जास्त वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. दोन्ही देश या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत (ICC Men’s T20 World Cup 2022) भिडणार आहेत.
मुंबई : भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) पुरुष क्रिकेट संघ या वर्षी एकापेक्षा जास्त वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. दोन्ही देश या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत (ICC Men’s T20 World Cup 2022) भिडणार आहेत. परंतु त्याआधी दोन्ही संघांमध्ये एक सामना होणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. श्रीलंकेत आशिया चषक 2022 स्पर्धा यावर्षी आयोजित केली जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेने (Asia Cup 2022 Announced) शनिवारी 19 मार्च रोजी यंदाच्या आशिया चषका स्पर्धेच्या आयोजनाला मान्यता दिली आहे. ऑगस्टच्या अखेरीस ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.
गेल्या दोन वर्षांपासून आशिया चषकाभोवती असलेला गोंधळ अखेर शनिवारी संपला. ही स्पर्धा 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु त्यानंतर कोरोनामुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 2021 मध्येही ती आयोजित करता आली नाही आणि त्यानंतर 2022 मध्ये श्रीलंकेत T20 फॉरमॅटमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले आहे. शनिवारी 19 मार्च रोजी आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर औपचारिकपणे सहमती झाली आणि 27 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होईल.
27 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार स्पर्धा
आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली. त्यानुसार यावर्षी 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत ही स्पर्धा सुरू होणार असून ती 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आशिया चषक स्पर्धेचा फॉरमॅट आतापर्यंत एकदिवसीय होता, परंतु यावेळी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. याशिवाय 20 ऑगस्टपासून क्वालिफायर सामने होणार आहेत.
The Asia Cup 2022 (T20 Format) will be held in Sri Lanka from 27 August – 11 September later this year. The Qualifiers for the same will be played 20 August 2022 onwards.
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) March 19, 2022
सहा संघांच्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या आशियातील पाच कसोटी दर्जाच्या संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल.
सर्वाधिक विजेतेपदं भारताकडे
आशिया चषक स्पर्धा सर्वप्रथम 1984 मध्ये UAE मध्ये आयोजित करण्यात आली होता. तेव्हापासून ही स्पर्धा आशियाई संघांमध्ये 15 वेळा खेळवण्यात आली आहे. यामध्ये भारताने सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारत या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे. टीम इंडियाने 2018 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.
इतर बातम्या
CSK IPL 2022: धोनीच बेस्ट फिनिशर का? शेवटच्या पाच षटकातील ‘या’ आकेडवारीवर नजर मारा म्हणजे समजेल