AFG vs SL : अफगाणिस्तानला गणितच जमलं नाही, फक्त स्टाफच्या ‘या’ एका चुकीमुळे आशिया कपमधून बाहेर!

Asia Cup 2023 AFganistan lost against Srilanka : आशिया कपमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामधील शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तान अवघ्या दोन धावांनी पराभूत झालं. आशिया कपमधून बाहेर पडलं आहे.

AFG vs SL : अफगाणिस्तानला गणितच जमलं नाही, फक्त स्टाफच्या 'या' एका चुकीमुळे आशिया कपमधून बाहेर!
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 11:35 AM

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये खरा हाय-व्होल्टेज सामना झाला. अफगाणिस्तान संघाचा या सामन्यामध्ये अवघ्या 2 धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये झालेल्या निसटत्या पराभवामुळे अफगाणिस्तान संघाचं सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं. फक्त दोन धावांनी पराभव झाल्याने संघातील खेळाडूला जिव्हारी लागलाय. सामन्यात टीम व्यवस्थापनाने  गणिताकडे लक्ष्य दिलं नाही. कारण अफगाणिस्तानच्या खेळाडूंना आणि स्टाफला एक गोष्ट माहित नव्हती की सुपर साठी पात्र व्हायचं असेल तर त्यांना श्रीलंकेने दिलेलं 292 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. त्यामुळे सामना फिरला आणि अफगाणिस्तानला विजयही मिळवता आला नाही.

इथूनही सामना फिरला असता पण……

38 व्या ओव्हमध्ये धनंजय डी सिल्वा याच्या बॉलिंगवर मुजीबने मोठा फटका खेळला. मात्र तो कॅच आऊट झाला. त्यावेळी सर्वांना वाटला सामना गेला पण सामना त्यांच्याच हातात होता. आता तो कसा तर जर मुजीब याने 38 व्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर एक धाव घेत राशिद खानला स्ट्राईक दिली असती आणि दुसऱ्या बॉलवर राशिदने चौकार आणि सिक्सर मारत सामना जिंकवला असता. या विजयासह अफगाणिस्तानचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला असता.

दरम्यान, मुजीब उर रहमान झिरोवर आऊट झाला. त्यानंतर फझलहक फारुकी स्ट्राईकवर आला. तर सेट राशिद खान स्ट्राईक एंडवर होता. राशिदला स्ट्राईक हवी होती. मात्र धनंजय डी सील्वहा याने फझलहक फारुकी याला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं आणि अफगाणिस्तानचा संघ ऑल आऊट झाला.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.