AFG vs SL | श्रीलंकेने टॉस जिंकला, अफगाणिस्तानसाठी ‘करो या मरो’
Afghanistan vs Sri Lanka Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेत आज अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका एकमेकांचा आमनासामना करणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
लाहोर | आशिया कप 2023 मधील सहाव्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. श्रीलंकेने या सामन्यात टॉस जिंकला आहे. श्रीलंका कॅप्टन दासून शनाका याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आशिया कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील आणि बी ग्रुपमधील हा शेवटचा सामना आहे. श्रीलंकेने आपला पहिला सामना बांगलादेश विरुद्ध जिंकलाय. तर अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभूत व्हाव लागलं होतं. त्यामुळे श्रीलंकेला हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. कारण सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी अफगाणिस्तानला चांगल्या नेट रन रेट हा सामना जिंकावा लागेल, कारण बांगलादेशने एक सामना जिंकलेला आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकला
🚨 TOSS ALERT 🚨
Sri Lanka have won the toss and decided to bat first. 👍#AfghanAtalan | #AsiaCup2023 | #AFGvSL | #SuperCola | #WakhtDyDaBarya pic.twitter.com/wAqOXyspkd
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 5, 2023
बांगलादेशने 2 पैकी एका सामन्यात विजय मिळवलाय. तर एक सामना गमावलाय. त्यामुळे बांगलादेशच्या खात्यात 2 पॉइंट्स आहेत. त्यामुळे श्रीलंका अफगाणिस्तान विरुद्ध जिंकल्यास सुपर 4 मध्ये क्वालिफाय करेल. सोबतच श्रीलंकेच्या विजयासह बांगलादेशही सुपर 4 मध्ये पोहचेल. मात्र अफगाणिस्तानला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे या सामन्याच्या निकालानंतर सुपर 4 मधील चारही संघ निश्चित होतील.
टीम इंडिया-पाक सुपर 4 मध्ये
दरम्यान टीम इंडिया ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. टीम इंडियाने नेपाळवर सोमवारी 4 सप्टेंहर रोजी 10 विकेट्सने विजय मिळवला. तर त्याआधी पाकिस्तानने शनिवारी 2 सप्टेंबरला सुपर 4 साठी क्वालिफाय केलं. त्यामुळे ए ग्रुपमधून दोन्ही संघ निश्चित आहेत. त्यामुळे आता बी ग्रुपमधून सुपर 4 मध्ये कोण पोहचतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.