Asia Cup 2023 : ‘विराट कोहलीनेच मला…’; भारत-पाक सामन्याआधी बाबर आझमचा मोठा खुलासा!
Asia Cup 2023 : पाकिस्तान संघाने पहिला सामना जिंकला त्यामध्ये कर्णधार बाबर आझमने 151 धावांची खेळी केली. बाबरने भारत-पाक सामन्याआधी विराट कोहलीबाबत पाहा काय म्हटला आहे.
मुंबई : आशिया कप 2023 महासंग्राम सुरू झाला असून भारत-पाक सर्वात हाय व्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव करत विजयी सलामी दिली. कर्णधार बाबर आझमने 181 धावांची खेळी करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे बाबरला रोखण्याचं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे असणार आहे. अशातच एक जुना व्हिडिओ व्हायरल होताना आहे यामध्ये बाबरने मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाला बाबर आझम?
विराट कोहलीकडून जेव्हा कौतुक होतं त्यावेळी मनोबल वाढत असल्याचं बाबर आझमने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. त्यासोबतच बाबरने विराट कोहलीने त्याला कशी मदत केली होती आणि त्याने दिलेले सल्ले उपयोगी पडल्याचंही जाहीरपणे सांगितलं. व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि बाबर एकमेकांबाबत बोलताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
2019 च्या वर्ल्ड कपवेळी विराट कोहली चांगला फॉर्म होता. तेव्हा त्याच्याकडे जात अडचण येत असलेल्या गोष्टींवर सल्ले घेतले. याचा फायदा त्याला बॅटिंगमध्ये झाल्याचं बाबर आझमने सांगितलं. बाबर आणि विराट कोहलीची कायम तुलना केली जाते. मात्र बाबर म्हणतो की, विराट कोहली एक मोठा खेळाडू असून त्याच्यासोबत तुलना होऊ शकत नाही. तर विराट कोहलीने बाबरबाबत बोलताना म्हणाला, तो एक चांगला खेळाडू असून तो भविष्यात आणखी चांगली कामगिरी करेल असं कोहली म्हणाला.
दरम्यान, टीम इंडिया आणि पाकिस्तानचा 2 सप्टेंबरला होणारा सामना श्रीलंकेमधील कँन्डी या मैदानावर होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडिया की पाकिस्तान कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे