BAN vs AFG | बांगलादेशने करो या मरो सामन्यात टॉस जिंकला, प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण?
Afgnistan vs Bangladesh Asia Cup 2023 | बांगलादेश क्रिकेट टीमने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. बांगलादेशसाठी 'करो या मरो' असा सामना आहे.
लाहोर | आशिया कप 2023 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. बांगलादेशचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. बांगलादेशला आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम राखावं लागणार आहे. तर अफगाणिस्तानचा हा आशिया कप 2023 मधील पहिलाच सामना आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला आहे.
सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात
बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला थोड्याच वेळात दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. श्रीलंकेने बांगलादेशला गेल्या सामन्यात पराभूत केलेलं. त्यामुळे आता बांगलादेश कशाप्रकारे आव्हान कायम राखत अफगाणिस्तानला टक्कर देते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आकडेवारी कुणाच्या बाजुने?
अफगाणिस्तान पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत. तसेच बांगलादेश आशिया कप 2008 नंतर पाकिस्तानमध्ये सामाना खेळत आहेत. आतापर्यंत बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 14 सामने झाले आहेत. यामध्ये बांगलादेशने 8 आणि अफगाणिस्तानने 6 सामने जिंकले आहेत.
बांगलादेश टॉसचा बॉस
🚨 TOSS ALERT 🚨
Bangladesh have won the toss and decided to bat first. 👍#AfghanAtalan | #AsiaCup2023 | #AFGvBAN | #SuperCola | #WakhtDyDaBarya pic.twitter.com/VH7dVSHcMZ
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 3, 2023
तसेच वनडे आशिया कपमध्ये दोन्ही संघ एकूण 3 वेळा आमनासामना झाला आहे. इथे अफगाणिस्तान वरचढ राहिली आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशवर 2 वेळा विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला एकदाच विजय मिळवता आला आहे. तसेच गद्दाफी क्रिकेट स्टेडियममध्ये 2021 पासून आतापर्यंत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा एकदा विजय झालाय. तर विजयी धावांचा पाठलाग करताना 2 वेळा विजय झालाय. या स्टेडियमवर पहिल्या डावात 290 एव्हरेज स्कोअर आहे.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, नजमूल हुसेन शांतो, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.