BAN vs SL Live Streaming | बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमनेसामने कोण जिंकणार?
Asia cup 2023 Bnagladesh vs Sri lanka Live Streaming | आशिया कप 2023 मधील दुसऱ्या सामन्यात बागंलादेश विरुद्ध श्रीलंका यांचा आमनासामना होणार आहे. या सामन्याबाबत जाणून घ्या.
कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील सलामीचा सामना 30 ऑगस्टला पार पडला. पाकिस्तान क्रिकेट टीमने नेपाळवर 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता 31 ऑगस्टला आशिया कप 2023 मधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमेनसामेने असणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळायला उतरणार आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघ 10 वर्षांनी पल्लीकेलेमध्ये आमनेसामने असतील. याआधी बांगलादेश विरुद्ध नेपाळ 2013 साली भिडले होते. तेव्हा बांगलादेशने श्रीलंकेवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता.
वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका आणि लाहिरु कुमारा या चौघांशिवाय श्रीलंका आशिया कपमध्ये खेळायला उतरतील. तर आशिया कपआधी बांगलादेशचा विकेटकीपर बॅट्समन लिटॉन दास हा प्रकृती स्थिर नसल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे दोन्ही संघांची स्थिती सारखची आहे. दरम्यान बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना केव्हा?
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना 31 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघांचा आशिया कप 2023 मधील पहिलाच सामना असणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना कुठे खेळवण्यात येणार?
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा पल्लेकले येथील पल्लेकले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर कुठे पाहता येईल?
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा मोबाईलवर डिज्नी हॉटस्टार एपद्वारे फुकटात पाहता येईल.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.
आशिया कपसाठी बांगलादेश क्रिकेट टीम | शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.