BAN vs SL Asia Cup 2023 | बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, श्रीलंका विरुद्ध अशी आहे प्लेईंग इलेव्हन
Bangladesh vs Sri Lanka Asia Cup 2023 | बांगलादेश क्रिकेट टीमने टॉस जिंकला आहे. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघाचा आशिया कप 2023 मधील हा पहिलाच सामना आहे.
पल्लकेले | आशिया कप 2023 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. बांगलादेशने आशिया कप 2023 मधील पहिल्याच सामन्यात टॉस जिंकला आहे. बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेश टीम श्रीलंकेला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये किती धावांचं आव्हान देतं, याकडे लक्ष असेल. या सामन्याला 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पल्लकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
दोन्ही संघांना मोठा फटका
बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ समदुखी आहेत, कारण त्यांचे खेळाडू दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. बांगलादेशचा विकेटकीपर सलामीवीर लिटॉन दास हा प्रकृती स्थिर नसल्याने आशिया कपमधून बाहेर झाला आहे. लिटॉन दास याच्या जागी बांगलादेश संघात अनामुल हक बिजॉय याचा समावेश करण्यात आलाय. मात्र श्रीलंका विरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून अनुभवी मुशफिकुर रहिम याला संधी देण्यात आली आहे.
तर श्रीलंकेचे 4 खेळाडू हे दुखापती असल्याने त्यांची आशिया कपसाठी निवड करता आली नाही. दिलशान मदुशंका, लाहिरु कुमारा, वानिंदु हसरंगा आणि दुष्मंथा चमीरा या चौघांना दुखापतीमुळे आशिया कपपासून दूर रहावं लागलं आहे. त्यामुळे आशिया कपआधीच दोन्ही संघांसाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
बांगलादेशने टॉस जिंकला
Asia Cup 2023: Bangladesh Vs Sri Lanka 🏏
Bangladesh have Won the Toss and decided to Bat First 🪙#BCB | #AsiaCup | #BANvSL pic.twitter.com/C99ns9FORc
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 31, 2023
पल्लकेलेमधील 8 एकदिवसीय सामन्यांबाबत
दरम्यान पल्लेकले या मैदानात वनडे सामन्यांमध्ये 295 हा एव्हरेज स्कोअर आहे. म्हणजेच या मैदानात किमान इतका स्कोअर होतोच. पल्लेकले इथे 2018 पासून आतापर्यंत 8 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यापैकी पहिले बॅटिंग करणाऱ्यांचा 5 वेळा विजय झाला आहे. तर 3 वेळा धावांचा पाठलाग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आता या सामन्यात कोण जिंकतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.