Asic Cup 2023 आधी टीमला मोठा झटका, ‘हा’ महत्त्वाचा मॅचविनर खेळाडू बाहेर
Asia Cup 2022 : टीम इंडियाचा आशिया कपमध्ये पहिला सामना पाकिस्तानसोबत पार पडणार आहे. .मात्र अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. आशिय कपमधून एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर झाला आहे.
मुंबई : आशिया कप 2023 च्या थराराला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये पार पडणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडू संपूर्ण आशिया कपमधून बाहेर झाला आहे. अचानक प्लेअर बाहेर झाल्यामुळे संघाला मोठा झटका बसला आहे. बांगलादेश संघाचा हा खेळाडू असून आजारपणामुळे त्याला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं आहे.
कोण आहे तो खेळाडू?
आशिया कप स्पर्धेबाहेर पडलेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून लिटन दास आहे. बांगलादेश संघाचा उद्या म्हणजेच 31ऑगस्टला श्रीलंकेसोबत होणार आहे. मात्र सामन्याआधी लिटन दास बाहेर झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांगलादेश संघाला आक्रमक बॅटींग करून देण्यात लिटन दास याचं महत्त्वपूर्ण योगदान देतो. त्याच्या जागी वेगळ्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे.
या खेळाडूची निवड-
आशिया कपमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लिटन दास याच्या जागी अनामूल हक बिजॉय याची निवड करण्यात आली आहे. बिजॉयने बांगलादेशकडून 44 वन डे सामने खेळले असून यामध्ये तीन शतकांसह 1254 धावा केल्या आहेत. बिजॉयने त्याचा शेवटचा सामना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येटीम इंडियाविरूद्धच्या घरच्या मालिकेमधील खेळला होता. बांगलादेश संघाची कर्णधारपदाची धुरा शकीब अल हसन याच्याकडे सोपण्यात आली आहे.
आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ:-
शकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, नईम शेख, शमीम हसन, शमीद हसन तमीम, तनझिम हसन साकिब आणि अनामूल हक बिजॉय