IND vs SL Asia Cup 2023 Final Weather | महाअंतिम सामन्यातही पावसाचा खोडा? कसं असेल हवामान?

ASIA CUP 2023 IND vs SL Asia Cup Final Weather Report | पावसाने आतापर्यंत संपूर्ण आशिया कप 2023 स्पर्धेची वाट लावली. आता टीम इंडिया-श्रीलंका फायनल मॅचचाही पाऊस खेळखंडोबा करणार का?

IND vs SL Asia Cup 2023 Final Weather | महाअंतिम सामन्यातही पावसाचा खोडा? कसं असेल हवामान?
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 4:15 PM

कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील अंतिम सामना हा 17 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानला अखेरच्या बॉलवर पराभूत करत श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली. तर त्याआधी टीम इंडियाने याच श्रीलंकेचा धुव्वा उडवत फायनलचं तिकीट बूक केलं होतं. आता हे दोन संघांमध्ये आशिया कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो इथे पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

ही संपूर्ण स्पर्धा पावसाने गाजवली. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला. तर याच पावसामुळे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात सुपर 4 मध्ये झालेला सामना हा राखीव दिवशी निकाली निघाला. तसेच सुपर 4 फेरीतील बहुतेक सामन्यांमध्ये पावसाने खोडा घातला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. अनेक क्रिकेट चाहते हे भारत आणि अन्य देशांमधून श्रीलंकेत सामने पाहायला गेले होते. मात्र पावसामुळे त्यांना सामन्याचा आनंद लुटता आला नाही. मात्र अनेक विघ्न पार पडल्यानंतर अखेर स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. आता फायनल सामना होणार आहे. या फायनल सामन्यादरम्यान हवामान कसं असेल, हे आपण जाणून घेऊयात.

हवामानाचा अंदाज काय?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 17 सप्टेंबरला पावसाची शक्यता आहे. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्याच्या दिवशी 90 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे. यामुळे या अंतिम सामन्यात ग्राउंड स्टाफची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.

श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.