कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील अंतिम सामना हा 17 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानला अखेरच्या बॉलवर पराभूत करत श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली. तर त्याआधी टीम इंडियाने याच श्रीलंकेचा धुव्वा उडवत फायनलचं तिकीट बूक केलं होतं. आता हे दोन संघांमध्ये आशिया कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो इथे पार पडणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.
ही संपूर्ण स्पर्धा पावसाने गाजवली. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला. तर याच पावसामुळे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात सुपर 4 मध्ये झालेला सामना हा राखीव दिवशी निकाली निघाला.
तसेच सुपर 4 फेरीतील बहुतेक सामन्यांमध्ये पावसाने खोडा घातला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. अनेक क्रिकेट चाहते हे भारत आणि अन्य देशांमधून श्रीलंकेत सामने पाहायला गेले होते. मात्र पावसामुळे त्यांना सामन्याचा आनंद लुटता आला नाही. मात्र अनेक विघ्न पार पडल्यानंतर अखेर स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. आता फायनल सामना होणार आहे. या फायनल सामन्यादरम्यान हवामान कसं असेल, हे आपण जाणून घेऊयात.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 17 सप्टेंबरला पावसाची शक्यता आहे. एक्युवेदर या वेबसाईटनुसार, सामन्याच्या दिवशी 90 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे. यामुळे या अंतिम सामन्यात ग्राउंड स्टाफची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.