IND vs SL Final 2023 | श्रीलंकेने अंतिम सामन्यात टॉस जिंकला, टीम इंडियात स्टार खेळाडूची एन्ट्री
Asia Cup 2023 Final IND vs SL Toss | आशिया किंग होण्यासाठी टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघ उत्सुक आहेत. मात्र आता दोघांपैकी कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी श्रीलंका क्रिकेट टीमने टॉस जिंकला आहे. श्रीलंका कर्णधार दासून शनाका याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या महाअंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
दोन्ही संघात बदल
या मेगा फायनल महामुकाबल्यासाठी टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही टीममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. श्रीलंकेत 1 बदल केला आहे. दुखापतीमुळे महीश थेक्षणा हा बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी दुशन हेमंथा याला संधी देण्यात आली आहे. तर टीम इंडियात तब्बल 6 बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियात बांगलादेश विरुद्धच्या सुपर 4 मधील अखेरच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये मुख्य खेळाडूंना विश्रांती देत बेंचवरील खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या या सामन्यात मुख्य खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. यामध्ये विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकला
It’s time for the #AsiaCup2023 Final 🎆
Sri Lanka have won the toss and opted to bat first against India 🏏 pic.twitter.com/DhyCApolfH
— ICC (@ICC) September 17, 2023
या स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री
दरम्यान टीममध्ये एका स्टार ऑलराउंडरने थेट अंतिम सामन्यात धडक मारत प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळवली आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल याला दुखापत झाली होती. अक्षर या दुखापतीमुळे आशिया कप फायनलमधून बाहेर पडला. त्यामुळे अक्षरच्या जागी युवा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली आहे.
आशिया कप 2023 फायनलसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.