IND vs SL Final Live Streaming | टीम इंडिया-श्रीलंका महाअंतिम सामना, फुकटात टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
Asia Cup Final 2023 Live Streaming IND vs SL | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 'मेगा फायनल' महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. हा सामना फ्रीमध्ये कसा पाहायचा जाणून घ्या.

कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धा ‘अंतिम’ टप्प्यात आहे. एकूण 6 संघातून अखेर 2 अंतिम संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका या दोन संघांनी अंतिम फेरीचं तिकीट मिळवलंय. या दोन्हा संघांनी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सुपर 4 मधील 3 पैकी 2 सामने जिंकलेत. तर 1 सामना गमावलाय. टीम इंडियाने श्रीलंकेलाच पराभूत करत अंतिम फेरी गाठली. तर श्रीलंकेने पाकिस्तानचा अखेरच्या बॉलवर 2 धावा करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता हा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना केव्हा?
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना हा 17 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना कुठे होणार?
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामन्याला किती वाजता होणार?
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना टीव्हीवर फ्री कुठे पाहता येणार?
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना टीव्हीवर फ्रीमध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना मोबाईलवर फ्रीमध्ये कसं पाहायचं?
टीम इंडिया-श्रीलंका अंतिम सामना मोबाईलवर हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, डुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.