Asia Cup 2023 Final | श्रीलंका विरुद्ध फायनलसाठी टीम इंडिया सज्ज, अशी असेल प्लेईंग ईलेव्हन

| Updated on: Sep 16, 2023 | 8:55 PM

Asia Cup 2023 Final Team India Probable Playing 11 | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी 17 सप्टेंबरला आशिया किंग होण्यासाठी हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईग ईलेव्हन?

Asia Cup 2023 Final | श्रीलंका विरुद्ध फायनलसाठी टीम इंडिया सज्ज, अशी असेल प्लेईंग ईलेव्हन
संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावणाऱ्या भारताला बांगलादेशच्या संघाने पराभूत केलं. या सामन्यामध्ये शतकवीर शुभमन गिल याचं झुंजार शतक व्यर्थ गेलं. शुभमन गिल याने 121 धावा केल्या होत्या मात्र सामन्याच्या शेवटला तो बाद झाला आणि भारताची तारांबळ उडाली.
Follow us on

कोलंबो | आशिया कप 2023 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका भिडणार आहेत. या दोघांमध्ये ‘आशिया किंग’ होण्यासाठी रविवारी 17 सप्टेंबर रोजी महाअंतिम सामना होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया या महामुकाबल्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल करु शकते. टीम इंडियाने याआधी सुपर 4 मधील अखेरच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये 5 बदल केले होते. याच खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री होणं निश्चित आहे.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमधून ‘रनमशीन’ विराट कोहली, ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांना विश्रांती देण्यात आली होती. या पाच जणांनाच श्रीलंका विरुद्धच्या अंतिम सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तसेच श्रीलंकाही अनेक बदलांसह मैदानात उतरायला तयार आहेत.

अशी असेल टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन

श्रीलंका विरुद्ध टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी नेहमीप्रमाणे ओपनिंग येईल. दोघांनीही आतापर्यंत या स्पर्धेत साखळी फेरीपासून ते सुपर 4 पर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा याने पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका विरुद्ध अर्धशतकं ठोकली होती. तर गिल यानेही तडाखा कायम ठेवलाय. गिलने बांगलादेश विरुद्ध झुंजार शतक ठोकलं. त्यामुळे या सलामी जोडीवर अंतिम सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच तिसऱ्या नंबरवर विराट कोहली खेळायला येईल. त्यामुळे शुबमन, रोहित आणि विराट हे टॉप 3 बॅट्समन असतील. चौथ्या क्रमांकावर विकेटकीपर केएल राहुल खेळू शकतो. ईशान किशनला पाचव्या स्थानी उतरवण्यात येऊ शकतो. ईशान गेमचेंजर आहे. त्याने आतापर्यंत अनेक सामने एकहाती फिरवले आहेत. तर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि आणि रवींद्र जडेजा खेळतील.

बॉलिंगची जबाबदारी कुणावर?

वेगवान बॉलिंगची जबाबदारी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असेल. तर शार्दुल ठाकुर याच्याकडे बॉलिंग आणि बॅटिंगची दुहेरी जबाबदारी असणार आहे. फिरकी बॉलिंगची धुरा कुलदीप यादव सांभाळेल. कुलदीपने पाकिस्तान 5 आणि श्रीलंका विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे कुलदीपकडून टीम इंडियाला अनेक अपेक्षा असणार आहेत.

टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.