Gautam Gambhir | गौतम गंभीर याने भर मैदानात…, तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Gautam Gambhir Viral Video | गौतम गंभीर, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर. गंभीर कायम मैदानात आणि मैदानाबाहेर त्याच्या विधानामुळे चर्चेत राहिला आहे. आता गंभीरचा एक व्हीडिओ व्हायरल झालाय.
कोलंबो | आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. नेपाळने टीम इंडियासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलंय. टीम इंडियाने 2.1 ओव्हरमध्ये बिनबाद 17 धावा केल्या. त्यानंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबलाय. या दरम्यान टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. गंभीर या व्हायरल व्हीडिओत अश्लील हावभाव करताना दिसत आहे. गंभीरच्या त्या अश्लील कृत्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
नक्की काय झालं?
व्हायरल व्हीडिओत गौतम गंभीर याला पाहून विराट कोहली याचे चाहते “कोहली कोहली” अशा घोषणा देऊ लागले. हे पाहून गौतम गंभीर याचा पारा चढला. त्यामुळे गंभीरनेही पाठीपुढे न पाहता स्टेडियममधील चाहत्यांना मधलं बोट दाखवून उत्तर दिलं. गंभीरची ही कृती चाहत्यांना आणि एकूणच नेटकऱ्यांना काही पटलेली नाही. “गंभीर हा माजी क्रिकेटर आहे. तसेच तो लोकसभा खासदार आहे. अशा मोठ्या व्यक्तीला असं करणं शोभा देत नाही”, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
गौतम गंभीर याचा व्हीडिओ व्हायरल
Gautam Gambhir 👀pic.twitter.com/5wj1bCddm4
— CricTracker (@Cricketracker) September 4, 2023
गौतम गंभीर याचं स्पष्टीकरण
“स्टेडियममधील काही जण हे भारतविरोधी घोषणा देत होते. मी एक भारतीय म्हणून माझ्या देशाबद्दल असं ऐकू शकत नाही. त्यामुळे मी तशी प्रतिक्रिया दिली. तुम्ही सोशल मीडियावर जे पाहता ते नेहमीच योग्य असतं असं नाही”, असं स्पष्टीकरण गौतम गंभीर याने व्हायरल व्हीडिओवर दिलं आहे. गंभीरने स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली. मात्र त्यानंतरही गंभीरकडून असं हावभाव करणं अपेक्षित नाही, असं नेटकरी म्हणत आहेत.
गौतम गंभीर व्हायरल व्हीडिओवर काय म्हणाला?
Middle finger Pakistan to dikhai, g@@nd Kohli aur Dhoni fans ki jal Rahi hai. You will always have my respect GG 🫡#GautamGambhir #INDvsNEPpic.twitter.com/Lkf9vGzI0b
— ً (@Ro45King) September 4, 2023
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.