IND vs PAK, Asia Cup 2023 : भारताने आजचा सामना जिंकला तर पाकिस्तानात खेळावंच लागणार! कसं ते समजून घ्या
IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होत आहे. पण टीम इंडियापुढे भलतंच टेन्शन आहे. भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकला तर लाहोरमध्ये सामना खेळावा लागणार आहे.
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानात सामने खेळण्यास नकार दिल्याने हा सामना श्रीलंकेत होत आहे. हायब्रिड मॉडेलवर ही स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामुळे काही सामने पाकिस्तानात तर काही सामना भारतात खेळले जाणार आहे. पण आशिया कप स्पर्धेतील वेळापत्रकातील एका चुकीमुळे भारताला एक सामना लाहोरमध्ये खेळावा लागू शकतो. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर असा प्रश्न भारतीय संघासमोर उभा राहिला आहे. भारत खेळत असलेल्या गटात नेपाळ आणि पाकिस्तान हे दोन संघ आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला पराभूत केलं आणि टॉपमध्ये जागा मिळवली आहे. पण भारताने पाकिस्तान आणि नेपाळला पराभूत केलं तर मात्र या गटात टीम इंडिया टॉपला राहील आणि एक सामना लाहोरमध्ये खेळावा लागेल.
…तर भारताला पाकिस्तानात खेळावं लागेल
दोन्ही गटातील टॉप दोनमध्ये असलेले संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाय करतील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तर तिसरा संघ नेपाळ आहे. पाकिस्तानने नेपाळला पहिल्याच सामन्यात 238 धावांनी पराभूत केलं आहे. तर भारत नेपाळला आरामात पराभूत करेल अशीच स्थिती आहे.त्यामुळे सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान दोन संघ पोहोचतील अशीच चर्चा आहे. अ गटात पाकिस्तानने नेपाळला पराभूत केल्याने टॉपला आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केलं तर गुण सारखेच राहतील आणि पॉइंडच्या आधारावर पहिला दुसरा क्रमांक ठरेल.
भारताने पाकिस्तानसह नेपाळला पराभूत केलं तर सर्व सामने जिंकत टॉपला राहिल. भारताचा ब गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना असेल. पण हा सामना पाकिस्तानातील लाहोरमध्ये असणार आहे. जर भारतीय संघ अ गटात दुसऱ्या स्थानी राहिला तर मात्र श्रीलंकेत सामना खेळावा लागेल. त्यामुळे सामन्याचं गणित कसं जुळून येतं यावर सर्व काही अवलंबून आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.