IND vs NEP सामना पावसामुळे रद्द झाल्यास टीम इंडिया Asia Cup 2023 मधून बाहेर?
India vs Nepal Rain asia cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे खेळ थांबवावा लागलाय.
पल्लेकेले | आशिया कप 2023 मधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेपाळ आमनेसामने आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. नेपाळच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात करुन दिली. कुशल भुरटेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात केली. या दोघांनी 65 रन्सची भागीदारी केली. मात्र त्यानंतर नेपाळने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी नेपाळला धक्क्यावर धक्के दिले.
त्यानंतर सामन्यात 37.5 ओव्हरनंतर पावसाची एन्ट्री झाली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. गेल्या अनेक मिनिटांपासून थांबला आहे. टीम इंडियाचा आशिया कप 2023 मधील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध झाला. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यात आता नेपाळ विरुद्धच्या सामन्यातही आता पावसामुळे खेळ थांबला आहे. त्यामुळे हा सामनाही रद्द झाला तर टीम इंडिया आशिया कप 2023 मधून बाहेर होणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. त्याआधी पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात एकूण 3 पॉइंट्स झाले. तर टीम इंडियाच्या खात्यात 1 पॉइंट झाला. तर नेपाळच्या पराभवामुळे त्यांचा नेट रन रेट आणखी खराब झाला.
सामना रद्द झाल्यास काय?
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामन्यात संध्याकाळी जवळपास 5 वाजून 45 मिनिटांनी पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे तब्बल पाऊण तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. सुदैवाने षटकं कमी करण्यात आली नाही. मात्र सामन्यात पुन्हा पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर टीम इंडियाला काहीही धोका नाही. कारण सामना रद्द झाला, तर टीम इंडियाला 1 पॉइंट मिळेल. तसंच नेपाळलाही 1 पॉइंट मिळेल. टीम इंडियाच्या 1 पॉइंट्सह आधीचा 1 पॉइंट, असे 2 पॉइंट्स होतील. तर नेपाळच्या खात्यात 1 पॉइंटच असेल. त्यामुळे टीम इंडिया सहज सुपर 4 साठी क्वालिफाय करेल.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.