IND vs NEP | टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामना पावसामुळे रद्द? बीसीसीआयची मोठी अपडेट
Team India vs Nepal Asia Cup 2023 | नेपाळ विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात पावसाने एन्ट्री घेतलेली आहे. त्यामुळे 1 तासापेक्षा अधिक वेळेपासून सामना थांबलेला आहे.
पल्लेकेले | आशिया कप 2023 स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. ग्रुप ए मधील हा सामना आहे. नेपाळने पहिले बॅटिंग करुन टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडिया विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 2.1 ओव्हरमध्ये बिनबाद 17 धावा केल्या. त्यानंतर सामन्यात पुन्हा एकदा पावसाने एन्ट्री घेतली.
पावसाच्या एन्ट्रीमुळे खेळ थांबला आहे. जवळपास दीड तासांपेक्षा अधिक वेळ थांबला आहे. त्यामुळे सामना होणार की नाही, असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. काही मिनिटात रात्री 10 वाजता पंचांकडून पाहणी केली जाईल, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.
बीसीसीआयने ट्विटमध्ये काय म्हटलंय?
The wait continues for resumption of play! ⌛️
The next inspection will take place at 10 PM Local Time (Same as IST).
Scorecard ▶️ https://t.co/i1KYESEMV1 #AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvNEP pic.twitter.com/TOBsBuBTCE
— BCCI (@BCCI) September 4, 2023
“सामना सुरु होण्याची प्रतिक्षा अजूनही आहे. स्थानिक वेळेनुसार 10 वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाणार आहे”, अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.
टीम इंडियाला सुधारित आव्हान
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंचांनी 10 वाजता पाहणी केली. पाहणीनंतर सामना होणार असल्याचं निश्चित झालं. मात्र पावसामुळे फार वेळ वाया गेला. त्यामुळे काही षटकांचा खेळ रद्द करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमांनुसार सुधारित आव्हान मिळालं. टीम इंडियाला आता 50 ओव्हरमध्ये 231 धावांऐवजी, 23 ओव्हरमध्ये 145 धावांचं सुधारित आव्हान मिळालं आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.