Asia cup 2023 India vs Pakistan Match Best XI : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी

Asia Cup 2023 India vs Pakistan Match Best XI : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे साऱ्या क्रीडा जगताचं लक्ष लागून आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? इथपासून ते कोणते खेळाडू आपली छाप पाडणार? इथपर्यंत चर्चांना उधाण आलं आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

Asia cup 2023 India vs Pakistan Match Best XI : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हे खेळाडू तुमच्यासाठी ठरतील लकी, जाणून घ्या आकडेवारी आणि पिच रिपोर्ट
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 4:25 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? या वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. दोन्ही संघांची क्षमता जबरदस्त असून हा सामना अतितटीचा होईल असंच क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पाकिस्ताननं आशिया कप स्पर्धेपूर्वी जबरदस्त कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धची कसोटी असो की, अफगाणिस्तानला वनडे मालिकेत दिलेला व्हाईटवॉश असो. इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाने आशिया आणि वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी केली आहे. दुखापतीतून सावरत दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची बाजूही भक्कम झाली आहे. त्यामुळे या सामन्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील, याबाबतचा अंदाज जाणून घेऊयात

पिच रिपोर्ट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. मैदान फलंदाज आणि गोलंदाजांसाठी पूरक आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू कमाल करू शकतात. तसेच प्रथम फलंदाजी करणारा संघ अंदाजे 240 पर्यंत मजल मारू शकतो. त्यामुळे हा स्कोअर गाठणं सोपं होईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला तर कर्णधार गोलंदाजी करणं पसंत करेल. दोन्ही संघ आतापर्यंत 132 सामने खेळले आहेत. यात पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 सामन्यात विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघात असलेला विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. म्हणजेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नसेल.

भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची संभावित प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ

अशी टीम ठरेल बेस्ट

टीम 1- मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, फखर झमान, शादाब खान, रवींद्र जडेजा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, शाहीन आफ्रिदी (उपकर्णधार), हारिस रौफ.

टीम2- मोहम्मद रिझवा (विकेटकीपर), विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, रोहित शर्मा, शादाब खान, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद शमी.

'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.