Asia Cup 2023 | टीम इंडिया-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द? कसं असेल हवामान?
Asia cup 2023 India vs Pakistan Weather Forecast | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान 2 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत. मात्र त्याआधी सामन्याच्या दिवशी पावसाचा काय अंदाज आहे? जाणून घ्या.
कोलंबो | पाकिस्तानने आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने नेपाळवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता 31 ऑगस्ट रोजी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना होणार आहे.तर 2 सप्टेंबरला ज्या सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय, तो सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे पल्लकले इथे करण्यात आलंय. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार भारत-पाक सामन्यावेळेस पाऊस होण्याची 90 टक्के शक्यता आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान सामना रद्द होणार?
भारत-पाकिस्तान सामन्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. वेदरडॉटकॉमनुसार, टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी 90 टक्के पाऊस होणारच असल्याचा अंदाज आहे. तसेच तापमान 28 डिग्री सेल्सियस इतकं असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी ही अतिशय वाईट बातमी आहे.
पाकिस्तानसमोर टीम इंडियाचं आव्हान
दरम्यान पाकिस्तानने नेपाळवर आशिया कपमधील पहिल्याच सामन्यात 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला. त्यानंतर पाकिस्तान ए ग्रुपमधील दुसरा सामना हा टीम इंडिया विरुद्ध असणार आहे. तर टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा पहिलाच सामना असेल. पाकिस्तानला टीम इंडियाला पराभूत करत सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी असेल. तर टीम इंडिया पाकिस्तानला नेहमीप्रमाणे पराभूत करत रुबाबदारी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरला कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.