IND vs PAK : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने गिरवला तोच कित्ता, सोपा झेल सोडल्याने ट्रोल Watch Video

IND vs PAK, Asia Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात खेळाडूंना एक चूक महाग पडते. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे चूक होऊ नये यासाठी खेळाडू दबावात असतात. पण शाहीन आफ्रिदीने झेल सोडण्याची चूक केली.

IND vs PAK : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने गिरवला तोच कित्ता, सोपा झेल सोडल्याने ट्रोल Watch Video
Video : पाकिस्तान पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये ढूसsss, शाहीन आफ्रिदीने हातातला कॅच सोडला
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 3:52 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. सुपर फोर फेरीतील ही लढत खूपच महत्त्वाची आहे. कारण अंतिम फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि बाबर आझमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी गोलंदाज भारतावर हावी होतील, असा विश्वास असल्याने त्याने हा निर्णय घेतला. दुसरीकडे, रोहित शर्मा यानेही नाणेफेकीचा कौल जिंकलो असतो तर फलंदाजीच घेणार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानच्या गोलंदाजीला कितीही धार असली तर क्षेत्ररक्षणात मात्र फिके पडत अससल्याचं दिसून आलं आहे. कारण दुसऱ्या षटकात पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने झेल सोडला आणि शुबमन गिल याला जीवदान मिळालं.

नेमकं काय झालं?

नसीम शाह याला संघाचं दुसरं षटक सोपवलं. त्याने अपेक्षेप्रमाणे अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि शुबमन गिलला पहिल्याच चेंडूवर जाळ्यात ओढलं. शुबमन गिल याला शॉर्ट आणि थोडा लांब चेंडू टाकला. हा चेंडू थेट बॅटच्या एजला लागून थर्ड मॅनकडे गेला. हा झेल आरामात टिपू शकला असता. पण शाहीन आफ्रिदी चेंडूवर उशिरा पोहोचला तसेच हातातला झेल सोडला. हा झेल पकडला असता तर शुबमन गिल शून्यावर बाद झाला असता.

शाहीन आफ्रिदीने शुबमन गिल याचा झेल सोडल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. मजेशीर मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरल्याशिवाय राहाणार नाही. शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या संघाच्या पाचव्या षटकावर शुबमन गिलने आक्रमक पवित्रा दाखवला. तीन चौकार ठोकत किती महत्त्वाचा झेल सोडून दिला ते दाखवून दिलं. पुन्हा एकदा बाद करण्याची संधी आली होती. पण तीही गमावली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.