मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. हा केवळ एक औपचारिक सामना असून टीम इंडियात पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाच खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तर तिलक वर्मा याने या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पप केलं आहे. या सामन्यासाठी विराट कोहली, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना आराम देण्यात आला आहे. त्याऐवजी संघात तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहली ड्रिंक बॉयच्या भूमिकेत दिसला. यावेळी त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं. मोहम्मद शमी पहिला विकेट मिळवून दिला. त्यानंतर शार्दुल ठाकुरने दोघांना तंबूत पाठवलं. यावेळी ब्रेक दरम्यान खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची जबाबदारी विराट कोहलीवर आली. त्याने आपल्या वेगळ्याच अंदाजात मैदानात धाव घेतली आणि खेळाडूंसाठी पाणी घेऊन आला.
Virat Kohli while carrying drink 😂😂#AsiaCup2023 #INDvsBANpic.twitter.com/iXeU7kIBAR
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 15, 2023
विराट कोहली याचा धावत येतानाचा अंदाज पाहून हसू आवरणार नाही. त्याच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात असून विराट कोहलीचं कौतुक होत आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.