Asia Cup 2023 : Ind vs Ban सामन्याआधी टीमला मोठा धक्का, ‘हा’ विकेटकीपर संघातून बाहेर!
आशिया कपमधील सुपर 4 मध्ये इंडिया आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ समोरा समोर येणार आहेत. पण या आधीच या संघातील विकेट कीपर फलंदाज संघातून बाहेर झाला आहे.त्यामुळे सामना सुरु होण्याआधीचं संघाला जबरदस्त झटका बसला आहे.
कोलंबो | टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंका संघांना पराभूत करत आशिया कप 2023 च्या फायनलचं तिकिट मिळवलं आहे. आता टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध सुपर 4 राउंडमधील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना 15 सप्टेंबरला श्रीलंकेतील प्रेमदास स्टेडिअममध्ये होणार आहे. बांग्लादेश स्पर्धेमधून बाहेर पडली आहे मात्र शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधीच संघातील विकेट कीपर फलंदाज आशिया कपमधून बाहेर गेल्याने या संघाला मोठा धक्का बसला आहे.
नेमका कोण आहे तो खेळाडू :
इंडिया आणि बांग्लादेश यांच्यात आशिया कपच्या सुपर 4 मधील सामना होणार आहे. जेव्हा जेव्हा इंडिया आणि बांग्लादेश या दोन्ही टीममध्ये सामना असतो तेव्हा हा खेळाडू चांगलाचं चालतो. या विकेट कीपर फलंदाजाने अनेक सामन्यात चांगले प्रदर्शन करुन संघाला विजय मिळवून दिला आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नाही तर बांग्लादेशचा मुश्फिकुर रहीम आहे. मुश्फिकुर रहीमने अनेकदा टीम इंडिया विरुद्ध चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्या संघात नसण्याने बांग्लादेश संघाला मोठा धक्का बसला आहे.
बाहेर जाण्यामागे नेमकं कारण काय ?
आशिया कप 2023 मध्ये बांग्लादेशचा संघ काही चांगले प्रदर्शन करु शकला नाही. सुपर 4 मध्ये बांग्लादेशला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बांग्लादेशचं आशिया कप 2023 मधील आव्हान संपुष्टात आलं. आता बांग्लादेश आणि इंडिया यांच्यात सुपर 4 मधील सामना रंगणार आहे.पण मुश्फिकुर रहीम आपल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार असल्या कारणाने तो संघात नसणार आहे.
आशिया कपसाठी बांगलादेशचा संघ -: शाकिब अल हसन (C), तन्झिद हसन, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफिफ हुसैन, शरीफुल इस्लाम, मोहम्मद नइम, महेदी हसन, तन्झिम हसन साकी , अनामूल हक, लिटन दास