IND vs NEP : टीम इंडियाला पद्धतशीर येड बनवलं, कोहली, जडेजा समोर चोरल्या 2 धावा

टीम इंडियाने एकदम खराब फिल्डिंग केली. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा दर्जेदार फिल्डिंगसाठी ओळखले जातात. मात्र नेपाळच्या बॅटरने त्यांच्यासमोर दोन धावा काढल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IND vs NEP : टीम इंडियाला पद्धतशीर येड बनवलं, कोहली, जडेजा समोर चोरल्या 2 धावा
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 9:44 PM

मुंबई : भारत आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या मॅचमध्ये नेपाळ संघाने दमखव दाखवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाणं नेपाळच्या दमा पोरांनी खणखणीतपणे वाजवललं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेपाळ संघाचा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अवघ्या 231 धावांवर आटोपला. मात्र या सामन्यामध्ये टीम इंडियाने एकदम खराब फिल्डिंग केली. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा दर्जेदार फिल्डिंगसाठी ओळखले जातात. मात्र नेपाळच्या बॅटरने त्यांच्यासमोर दोन धावा काढल्या.

तिघांच्या समोर चोरल्या 2 धावा

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर नेपाळच्या बॅट्समनने बॉल प्लेट केला, चोरटी धाव घेतली पण फिल्डरच्या हातात चेंडू असल्याने स्ट्राईकवरचा फलंदाज माघारी फिरला. मात्र फिल्डरने केलेला थ्रो थेट स्टंम्पवर बसला आणि लगोलग दोघांनी धाव घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी चेंडू रविंद्र जडेजाच्या हातात गेलेला चेंडू त्याने थ्रो केला मात्र चेंडू मिस झाला त्यानंतर वेगाने जात असताना दुसऱ्या खेळाडूने अडवला. तेव्हाही दोघांनी एक धाव पूर्ण केली.

पाहा व्हिडीओ-

ज्या चेंडूवर एकही धाव होत नव्हती तिथे सहज दोन धावा निघाल्या. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसला. तर विराट कोहलीला जर काही वेळ विश्वासच बसला नाही की दोन धावा पूर्ण झाल्या आहेत. त्यावेळी हार्दिक पंड्या हसत होता. हे हसू म्हणजे स्वत: च हसू केल्यासारखं होतं.

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), रोहित पौडेल (C), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.