Asia Cup : भारत-पाकिस्तान मॅचवेळच्या जाहिरातींवर पैशांचा पाऊस, आकडा ऐकूण येईल आकडी!
IND vs PAK ASIA CUP 2023 : टीम इंडिया आणि पाकिस्तानचा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. जगभरातील चाहते हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी आतुर असतात. अशातच या सामन्यांच्यामध्ये ज्या जाहिराती असणार आहेत त्यांच्या रेटचा आकडे समोर आला आहे.
मुंबई : आशिया कप 2023 मधील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानमधील मुलतान या क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना 2 सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी या क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. या सामन्याची अनेक क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर क्रिकेट वर्तुळात सर्वत्र भारत आणि पाकिस्तान या सामन्याची चर्चा आहे. या सामन्याचा क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशातच या सामन्यामध्ये दाखवलेल्या जाहिरामागे प्रत्येकी 10 सेकंदाला इतकी मोठी रक्कम आकारली जाणार आहे.
आशिया कपमधील सामने कधी आणि कुठे पाहता येणार ?
आशिया कपमधील होणारे सर्व सामने हे आपल्याला टीव्हीवर ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ यावर लाइव्ह पाहता येणार आहेत. तर सर्व सामन्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रिमिंग आपल्याला ‘डिजनी प्लस हॉटस्टार’ या अॅपवर पाहता येणार आहे. जिओ सिनेमाच्या मागोमाग आता डिजनी प्लस हॉटस्टारनं सामन्यांची मोफत स्ट्रिमिंग करायला सुरुवात केली आहे.या वेळेस डिजनी प्लस हॉटस्टार वर आशिया कप आणि वन-डे वर्ल्डकप मोफत पाहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यातील प्रत्येकी 10 सेकंदामागचा गगनाला भिडलेला दर ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
भारत-पाक सामन्यातील 10 सेकेंदाच्या जाहिरातींसाठी लाखो रूपये
इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील सामन्या दरम्यान 10 सेकंदाची जाहिरात चालवण्यासाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. आशिया कपसाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिजनी प्लस हॉटस्टार या दोन्हींवर 17 स्पॉन्सर्स आणि 100 हून अधिक जाहिरातींसोबत करार करण्यात आला आहे. तर केवळ आशिया कपच्या सामन्यांमध्ये चालवलेल्या जाहिरातीतून डिजनी प्लस हॉटस्टार 350 ते 400 कोटींची कमाई करण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्स नुसार वर्तवली जातं आहे.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ :
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन.