IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर, कीपर म्हणून मुंबईकर खेळाडूची एन्ट्री
Asia Cup 2023 IND vs PAK : मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना खाली बसवण्यात आलं आहे. टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर झाली आहे.
मुंबई : आशिया कपमधील तिसऱ्या भारत आणि पाकिस्तानविरूद्धच्या महमुकाबल्याला काही वेळात सुरू होणार आहे. टॉस जिंंकत कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने चार बॉलर आणि दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना खाली बसवण्यात आलं आहे. टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर झाली आहे.
इशान किशन याला संघाती कीपर म्हणून स्थान मिळालं आहे. सूर्या आणि अय्यरमध्ये रोहित आणि टीम मॅनेजमेंटने अय्यरला पसंती दिली आहे. सूर्याला वन डे क्रिकेटमध्ये सातत्य राखता आलं नाही याचाच फटका त्याला बसला आहे. सूर्याचे आणि श्रेयसचे आकडे पाहिले तर लक्षात येईल की दोघांमध्ये अय्यरचं पारडं वरचढ आहे. के.एल. राहुल दुखापती असल्याने त्याच्या जागी संघात इशान किशन याला संघात स्थान देण्यात आलं आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला त्यानंतर विराट कोहली आणि मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. रोहितने स्पिनर्समध्ये कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजातकडे तर वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.