PAKvs NEP : दुबळ्या नेपाळला पाकिस्तानने धुतलं, जिंकण्यासाठी ‘इतक्या’ धावांचं आव्हान!

NEPvsPAK : आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने 151 धावांची दीड शतकी खेळी केली. त्यानंतर इफ्तिखार अहमद याचं 109 धावांचं वादळी शतकाने पाकिस्तान संगाने 300 धावांचा टप्पा पार केला.

PAKvs NEP : दुबळ्या नेपाळला पाकिस्तानने धुतलं, जिंकण्यासाठी 'इतक्या' धावांचं आव्हान!
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 7:20 PM

मुंबई : आशिया कप 2023 मधील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ या दोन संघांमध्ये सुरू आहे. तर पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने नेपाळ समोर 343 धावांचं डोंगराएवढं लक्ष ठेवलंय. कर्णधार बाबर आझमच्या 151 धावा आणि इफ्तिखार अहमद याची नाबाद 109 धावांची आक्रमक शतकी खेळी या दोघांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तान संघाने 342 धावा केल्या आहेत. तरनेपाळकडून सोमपाल कामी याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी हे लक्षाचा पाठलाग करावा लागणार आहे.

पाकिस्तान संघाची सुरुवात एकदम खराब झाली. सलामीवीर फखर झमान अवघ्या 14 धावा करून परतला ती विकेट गेली नाही तर त्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर इमाम उल हक हा 5 धावांवरून आऊट झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या डावाला उतरती कळा लागते का असं वाटू लागलं होतं. मात्र कर्णधार बाबर आजम आणि रिझवान दोघांनी भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. पुन्हा पाकिस्तानने ती चूक केली मोहम्मद रिजवान 44 धावांवर रन आऊट झाला.

दोघांची जोडी फुटली त्यानंतर आलेल्या सलमान अली आघा हा सुद्धा 5 धावा करून माघारी परतला. त्यामुळे पाकिस्तानचा डाव गडगडतो की काय अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद या दोघांच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तान संघाने तीनशे धावांचा डोंगर ओलांडला. बाबरने 151 धावा केल्या या खेळीमध्ये त्याने 14 चौकार तर 4 षटकार मारले. तर इफ्तिखारने अवघ्या 71 चेंडूंमध्ये 109 धावा करत वादळी शतक ठोकलं. यामध्ये त्याने 11 चौकार तर 4 षटकार मारले.

नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.