PAK vs BAN | पाकिस्तानचा सुपर 4 मध्ये धमाकेदार विजय, बांगलादेशवर 7 विकेट्सने मात
Pakistan vs Bangladesh Asia Cup 2023 Super 4 | पाकिस्तानने सुपर 4 मध्ये शानदार सुरुवात करत बांगलादेशवर दणकेदार विजय मिळवला आहे. पाकिस्तानने बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा उडवलाय.
लाहोर | पाकिस्तान क्रिकेट टीमने सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. आहे. बांगलादेशने पाकिस्तानला विजयासाठी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानकडून 2 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत विजयाचा मार्ग सोपा करुन दिला. या विजयासह पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा आता आणखी वाढल्या आहेत. तर बांगलादेशला आव्हान कायम राखण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
पाकिस्तानची बॅटिंग
पाकिस्तानच्या विजयात सर्वांनी योगदान दिलं.पाकिस्तानच्या पाचही फलंदाजांनी दुहेरी धावा केल्या. तर पाकिस्तानकडून ईमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी अर्धशतकं ठोकली. फखर झमान याने 20 आणि कॅप्टन बाबर आझम याने 17 धावांचं योगदान दिलं. ईमाम उल हक याने 84 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 78 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवान आणि आघा सलमान या जोडीने पाकिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. रिझवानने 79 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या. तर आघाने नाबाद 12 रन्स केल्या तर बांगलादेशकडून मेहदी हसन आणि आणि तास्किन अहमद या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पाकिस्तानचा तडाखेदार विजय
Remarkable team effort by Pakistan! Rauf’s exceptional bowling, with figures of 4/19, set the stage by limiting the Tigers to a modest total of 193. In response, Imam and Rizwan’s 50s ensured a confident chase, resulting in a promising 7-wicket win. 🇵🇰#AsiaCup2023 #PAKvBAN pic.twitter.com/fuehIGRKBG
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 6, 2023
बांगलादेशची बॅटिंग
त्याआधी बांगलादेश टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर बांगलादेश ढेर झाली. मात्र कॅप्टन शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम दोघांनी शतकी भागीदारी करत बांगलादेशला 192 धावांपर्यंत पोहचवलं. शाकीबने 53 आणि मुशफिकर याने 64 धावा केल्या. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. पाकिस्तानकडून हरीस रऊफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नसीम शाह याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर फहीम अश्रफ आणि शाहीन अफ्रिदी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.