Asia cup 2023 PAK vs IND Live Streaming | टीम इंडिया-पाक महामुकाबला फुकटात पाहता येणार, जाणून घ्या

Asia cup 2023 Pakistan vs India Live Streaming | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप स्पर्धेच्या माध्यमातून आमनेसामने येणार आहेत. या सामन्याबाबत सर्वकाही जाणून घ्या.

Asia cup 2023 PAK vs IND Live Streaming | टीम इंडिया-पाक महामुकाबला फुकटात पाहता येणार, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 10:04 PM

कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आशिया कप 2023 मधील महामुकाबला हा श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. पाकिस्तान आणि टीम इंडिया हे दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ श्रीलंकेत पोहचले आहेत. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवत जोरदार सुरुवात केली. पाकिस्तानने या विजयासह सुपर 4 च्या दिशेने एक पाउल पुढे टाकलं. आता टीम इंडिया पाकिस्तान विरद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेला सुरुवात करणार आहे.

टीम इंडियाचा आशिया कपमध्ये विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी तयार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पार पडणार?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा श्रीलंकामधील कँडी शहरातील पल्लेकेल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारत-पाक सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर टॉस अर्धा तास आधी म्हणजेच 2 वाजून 30 मिनिटांनी होईल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कोणत्या चॅनेलवर होणार?

भारत-पाक सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.

डिजीटल स्ट्रिमिंग कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना मोबाईलवर अगदी फुकट पाहता येईल. त्यासाठी तु्म्हाला हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल. मात्र तुम्हाला लॅपटॉपवर फुकटात पाहता येणार नाही.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.