PAK vs IND, Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन जाहीर
Asia Cup 2023 Pakistan vs India | आशिया कपमधील सर्वात मोठा सामना हा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात असणार आहे. या सामन्यासाठी टीमने तब्बल 19 तासांआधी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 मध्ये एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 13 सामन्यांपैकी सर्वात मोठा सामना हा शनिवारी 2 सप्टेंबरला पार पडणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या कडवट प्रतिस्पर्धी संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी या हायव्होल्टेज मॅचसाठी कंबर कसली आहे. पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
पाकिस्तानने या सामन्याच्या 19 तासांआधी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. बाबर आझम या टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर शादाब खान हा उपकर्णधार असणार आहे.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन जाहीर
Pakistan to field same playing XI tomorrow 🇵🇰#PAKvIND | #AsiaCup2023 pic.twitter.com/qe18Ad6pF4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2023
पाकिस्तानची अनचेंज टीम
पाकिस्तानने विनिंग टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम मॅनेजमेंटने नेपाळ विरुद्ध खेळवलेल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला होता. पकिस्तानने 19 तासांआधी टीम जाहीर केल्याने आम्ही सज्ज असल्याचा इशाराच टीम इंडियाला दिला आहे. आता टीम इंडिया या 11 खेळाडूंचा कसा सामना करणार,याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ओपनिंग जोडी कोण?
टीम मॅनेजमेंटने प्लेईंग इलेव्हनमध्ये 3 स्पिनन बॉलिंग ऑलराउंडर्सचा समावेश केला आहे. तसेच पाकिस्तानची बॅटिंगही मजबूत आहे. फखर झमान आणि इमाम उल हक हे दोघे ओपनिंग करतील. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद आणि सलमान आगा या चौकडीवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल. तसेच शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांच्यातही बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तर पेस अटॅकची धुरा नसीम शाह, शाहीन अफ्रीदी आणि हरिस रऊफ यांच्याकडे आहे.
टीम इंडिया विरुद्धच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).