PAK vs IND | पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडियात किती बदल?

Pakistan vs Team India Asia Cup 2023 Super 4 | टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान टॉसचा बॉस ठरला आहे. या महामुकाबल्यासाठी पाकिस्तान आणि टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे पाहा.

PAK vs IND | पाकिस्तानने टॉस जिंकला, टीम इंडियात किती बदल?
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 3:31 PM

कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हे कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलंय. टीम इंडियाचा सुपर 4 मधील हा पहिला सामना आहे. तर पाकिस्तानचा दुसरा सामना आहे. पाकिस्तानने सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तान टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवून फायनलचा दावा आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्न असणार आहे.

पाकिस्तान टॉसचा बॉस

पाकिस्तान क्रिकेट टीमने या हायव्होल्टेज सामन्यात टॉस जिंकला आहे.  टीम इंडियाने टॉस गमावला असला तरी दोन्ही कर्णधारांना जे हवं होत तेच मिळालंय. त्यामुळे दोन्ही कर्णधार आनंदी आहेत.  पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाने  या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत.  श्रेयस अय्यर याच्या जागी के एल राहुल याला संधी देण्यात आली आहे.  तर जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने मोहम्मद शमीला बाहेर पडावं लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया-पाकिस्तानचे 11 शिलेदार

जसप्रीत बुमराह साखळी फेरीतील सामन्यानंतर आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. त्यामुळे नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी बुमराहच्या जागी मोहम्मद शमी याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. तर पाक विरुद्ध ईशान किशन आणि केएल राहुल या 2 विकेटकीपर बॅट्समनपैकी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार, याबाबत जोरदार चर्चा होती. मात्र कॅप्टन रोहित शर्माने मोठा गेम केला. रोहितने या दोघांना संधी दिली. तर केएलसाठी श्रेयसला बाहेरचा रस्ता दाखवला.

तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन बाबर आझम याने आपल्या त्या 10 खेळाडूंवरच विश्वास दाखवला आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानने आशिया कप 2023 मध्ये यावेळेसही या सामन्याच्या एक दिवसआधी 9 सप्टेंबर रोजी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली.

भारत-पाक दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान हे दोन्ही कट्टर संघ या आशिया कप 2023 स्पर्धेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी टीम इंडिया-पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी भिडले होते. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने 48.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 266 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानच्या बॅटिंगच आली नाही. पाऊस थांबत नसल्याने हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉईंट देण्यात आला.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.