Babar Azam | ‘हा’ गोलंदाज करणार बाबर आझमची दांडी गुल,या दिग्गजाची भविष्यवाणी
india vs pakistan asia cup 2023 | आशिया कपमधील पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया महामुकाबल्याला अवघे काही तास बाकी आहेत. त्याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याने भविष्यवाणी केली आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 ला 30 ऑगस्टला सुरुवात झाली. पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तान आणि श्रीलंका यांना विजय मिळवण्यातं यश आलं.आशिया कप 2023 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने नेपाळ विरुद्ध 151 धावांची शतकी खेळी केली. बाबरच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बाबर आझमने पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटींगच्या जोरावर नेपाळच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. या खेळीकडे पाहता पाकिस्तानच्या बाबर आझमला चांगलाचं फॉर्म गवसला आहे.
आता पाकिस्तान साखळी फेरीतील दुसरा आणि अंतिम सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा आशिया कपमधील हा पहिलाच सामना असणार आहे. या महामुकाबल्यासाठी इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. टीम इंडियासमोर बाबरचं आव्हान असणार आहे. मात्र टीम इंडियाचा एक बॉलर हा आझम याची विकेट घेईल, अशी भविष्यवाणी टीम इंडियाच्या माजी खेळाडूने केली आहे.
इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला काही तासच शिल्लक आहेत. बाबर आझम हा टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरु शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबर आझम काही खास खेळी करु शकणार नाही, तर टीम इंडियाचा मोहम्मद शमी हा बाबरची विकेट घेऊ शकतो, अशी भविष्यवाणी मोहम्मद कैफ याने केली आहे.
हा बॉलर घेणार बाबरची विकेट
“इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात बाबर आझम काही खास करु शकणार नाही. टीम इंडियातील मोहम्मद शमी हा एक असा गोलंदाज आहे जो बाबर आझमची विकेट घेऊ शकतो. मोहम्मद शमी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. शमीने टीम इंडियासाठी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीने टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली. तसेच शमीने आयपीएलमध्येही चांगले प्रदर्शन केलेलं. त्यामुळे शमीच्या गोलंदाजीमध्ये बाबर आझमला आऊट करण्याची क्षमता आहे”, अशी भविष्यवाणी मोहम्मद कैफ याने स्टार स्पोर्टस्वर एका कार्यक्रमादरम्यान केली.
बाबर टीम इंडिया विरुद्ध फ्लॉप
बाबर आझमने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध एकूण 5 वन-डे सामने खेळले आहेत. बाबर आझमने या 5 सामन्यांत फक्त 158 धावा केल्या आहेत. बाबरने भारत विरुद्ध वन-डे सामन्यांत अजूनही एकही शतक केलेलं नाही. पण 2023 मध्ये बाबर आझम चांगल्याचं फॉर्ममध्ये दिसतोय. बाबरने यावर्षी आतापर्यंत खेळल्या 12 वनडेत 6 हाफ सेंचुरी आणि 2 सेंच्युरी केल्या आहेत. मात्र बाबरचा सध्याचा फॉर्म पाहता तो टीम इंडियासाठी डोके दुखी ठरु शकतो.