PAKvsNEP : मोहम्मद रिझवानला अतिशहानपणा नडला, नेपाळच्या दिपेंद्रने उतरवला माज, पाहा व्हिडीओ
Mohammad Rizwan Run Out : आशिया कपचा पहिला सामना सुरू असून पाकिस्तानच्या खेळाडूंची दाणादाण उडाली आहे. स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान रन आऊट झाला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात आशिया कपमधील पहिला सामना खेळवला जात आहे. हा सामना पाकिस्तानमधील मुलतान या क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जातं असून या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सलामीसाठी आलेले पाकिस्तानी फलंदाज फखर जमान आणि इमाम-उल-हक लवकरच तंबूत परतले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान या दोघांनी मिळून पाकिस्तानचा विस्कटलेला डाव सावरला. पण रिझवानच्या रन आऊट झाल्याने पाकिस्तानची खेळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आधीच रनआऊटने विकेट गेलेली असतानाा चोरटी काढण्याच्या प्रयत्नात त्याला आपली विकेट गमवावी लागली.
पाहा व्हीडीओ:-
Rizwan😭???
What was that 😭??#PAKvsNEP #AsiaCup2023 #AsiaCup23 #PakvsNepal pic.twitter.com/HSJnBDQous
— Umais Malik 🇵🇰 (@RRstan1) August 30, 2023
पाकिस्तानचे सलामी फलंदाज अवघ्या काही धावा करुन तंबूत परतल्यानंतर बाबर आणि रिझवान यांच्यात झालेल्या पार्टनरशीपने पाकिस्तानचा डाव सावरला होता. या दरम्यान, नेपाळच्या संदिप लमिछाने याने टाकलेल्या चेंडूवर पाकिस्तानी रिझवानने कव्हर पॉइंटच्या दिशेने एका धावेसाठी चेंडू टोलावला असता, चेंडू दिपेंद्र सिंग या फिल्डरकडे गेला. त्याने बॉलिंग एंडच्या दिशेने धावत असलेल्या रिझवानच्या दिशेने केलेला थ्रो डायरेक्ट स्टंपला लागला.
एका धावेच्या प्रयत्नात असलेला रिझवानला वाटलं की आपण आरामात दुसऱ्या एंडला पोहचू पण त्याचा या ओव्हर कॉन्फिडन्सनेचं त्याच्या खेळीचा घात केला. जेव्हा स्टंपला चेंडू लागला होता तेव्हा रिझवानचा एक पाय हवेत होता. त्यामुळे अंपायर्सकडून रिझवानला अवघ्या 44 धावांवर रन आऊट देण्यात आलं.
नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.