Asia Cup 2023 PAK vs NEP | कॅप्टन रोहित पौडेल याचा रॉकेट थ्रो, पाकिस्तानचा इमाम रन आऊट
Imam Ul Haq Run Out By Rohit Paudel Video | नेपाळ क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित पौडेल याने रॉकेट थ्रो करत पाकिस्तानच्या इमाम उल हक याला रन आऊट केलं. पाहा व्हीडिओ
मुल्तान | पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिला सामना हा खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून नेपाळ विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला. हा सामना मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. बाबर आझम पाकिस्तानचा कॅप्टन आहे. तर रोहित पौडेल याच्याकडे नेपाळ टीमची सूत्रं आहेत. नेपाळच्या गोलंदाजांनी बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानला चांगलंच बांधून ठेवलं. नेपाळला याचा चांगलाच फायदा झाला.
नेपाळने पाकिस्तानला 6 व्या ओव्हरमध्येच पहिला झटका दिला. करण केसी याने पाकिस्तानच्या फखर झमान याला 14 धावांवर आसिफ शेख याच्या हाती कॅच आऊट केलं. करण केसी याने सहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर फखरचा काटा काढला. त्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा झटका लागला. पाकिस्तानला इमाम उल हक याच्या रुपात दुसरी विकेट गमवावी लागली. नेपाळ कॅप्टन रोहित पौडेल याने कडक थ्रो करत इमाम उल हक याला रन आऊट केलं.
नक्की काय झालं?
इमामने मिड ऑफच्या दिशेने बॉल फुश केला. त्यानंतर इमामने एक धाव घ्यायचं ठरवलं. मात्र इमामचा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि 5 धावांवर रनआऊट झाला. इमामने मारलेला शॉट हा एक टप्पा घेऊन थेट कॅप्टन रोहित पौडेल याच्या दिशेने गेला. रोहितने अचूक बॉल पकडत थेट नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने डायरेक्ट थ्रो केला. रोहितने थ्रो केलेला बॉल डायरेक्ट स्टंपवर जाऊन लागला. इमामने डाईव्ह मारत स्वत:ला वाचवण्यासाठी झेप घेतली, मात्र तोवर इमाम रन आऊट झाला होता.
इमाम उल हक रन आऊट
What a direct hit by Rohit Paudel. Imam Ul Haq departs.#NEPvPAK #AsiaCup2023 pic.twitter.com/kxHkEhAL4p
— Abdullah Neaz (@Abdullah__Neaz) August 30, 2023
नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.