Video PAK vs SL | …अन पाकिस्तानचं आशिया कपचं स्वप्न भंगलं, शेवटच्या बॉलचा थरार, पाहा काय घडलं?
PAK vs SL : पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंका संघाने 2 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानने मुसंडी घेतली होती मात्र श्रीलंकेच्या असलंकाने सामना फिरवला.
मुंबई : आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये (Asia Cup PAK vs SL 2023) श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गतविजेत्या श्रीलंका संघाने 2 विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयासह आशिया कपमध्ये श्रीलंका संघाने बाराव्यांदा प्रवेश केला आहे. पाकिस्तानने सामना आपल्या पारड्यात झुकवला होता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये असलंका याने चतुराईने दोन धावा घेतल्या. बाबरचं चुकलंच त्याचाच फायदा असलंका याने घेतला आणि भारताला विजय मिळवून दिला.
शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जाण्याआधी शाहिन आफ्रिदीने सलग दोन विकेट्स घेत सामन्यात रंगत आणली होती. आफ्रिदीने डिसिल्वा आणि वेललागेला आऊट केलं होतं. त्यानंतर पाकिस्तान सामन्यात मुसंडी मारणार असं वाटत होतं. शेवटच्या सामन्यात पाकिस्ताचा मलिंगा म्हणून ओळखला जाणाऱ्या जमान खान याने कडक बॉलिं केली होती. मात्र कट लागून गेलेला चौकार आणि त्यानंतर दोन धावा घेत श्रीलंकेने सामना जिंकला.
पाहा व्हिडीओ-
what an exciting match Sri Lanka defeated Pakistan and entered the final#PAKvsSL #SriLanka pic.twitter.com/3IbymyW7hG
— 𝐃𝙴𝚅 ࿐ (@Devendr47974332) September 15, 2023
सामन्याचा धावता आढावा-:
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने 252 धावा केल्या होत्या. यामध्ये मोहम्मद रिझवान नाबाद 86 आणि अब्दुल्लाह शफीक 52 धावा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तान संघाने 250 चा टप्पा पार केला होता. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाची सुरूवात खराब झाली होती. मात्र समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांनी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मात्र शेवटी काही अंतराने विकेट पडत गेल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये लंकेच्या खेळाडूंनी सामना जिंकला.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर झमान, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.